शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अंबक येथील सरपंच आरक्षण बदलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यात अंबक येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्री आरक्षण पडले आहे. मात्र, या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षणात एकही जागा नव्हती. त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रर्वगातील एकही महिला सदस्य नाही. परिणामी सरपंचपद रिक्त राहणार आहे. याचा गावाच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी येथील सरपंचपदाचे आरक्षण बदलण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत शासन स्तरावर अधिकृत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अंबक ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना झाला. यात काँग्रेसने १०, तर भाजपने एक जागा जिंकली आहे. विजयी उमेदवारात सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, अनुसूचित जाती या प्रवर्गातील उमेदवार आहेत. यातील बहुतांश उमेदवारांना आपल्याच प्रवर्गातील आरक्षण पडेल. अशी अपेक्षा होती. मात्र, आरक्षण सोडत झाल्यानंतर या सर्वांचीच निराशा झाली. अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने आता सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंच पदाची निवडही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली बोलविलेल्या विशेष बैठकीत केली जाते. यामुळे आता उपसरपंच निवड कशी होणार याबाबतही उत्सुकता आहे. प्रशासनाने सरपंच निवडीचे निकष लावून उपसरपंच निवड तरी तातडीने घ्यावी आणि सरपंच पदाचा कारभार उपसरपंचांकडे सोपवावा. असा एक मतप्रवाह अंबक येथे सुरू झाला आहे. यामुळे आता सरपंच आरक्षण बदलणार की उपसरपंच कार्यभार पाहणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

चौकट -

निवडणुकीनंतर सोडतीचा परिणाम

सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीपूर्वी झाली असती आम्ही नियमानुसार योग्य त्या जागेवर अनुसूचित जाती स्त्री उमेदवार

निवडून आणला असता. शासनाने निवडणुकीनंतर आरक्षण सोडत घेतल्याचा हा परिणाम आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त हाेत आहे.

फोटो : ३० कडेगाव १

ओळ : अंबक (ता. कडेगाव) येथे सरपंच आरक्षणाबाबत ठोस निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेले ग्रामस्थ व नूतन सदस्यांमध्ये ग्रामपंचायतीसमोर चर्चा रंगल्या हाेत्या.