शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा पारा ४२.३ अंशावर

By admin | Updated: May 19, 2016 00:23 IST

अघोषित संचारबंदी : झळा असह्य

सांगली : जिल्ह्याच्या तापमानात वेगाने वाढ होत असून शेजारील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यापेक्षाही सांगली जिल्ह्याचे तापमान अधिक आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते ओस पडले होते. अघोषित संचारबंदीचेच चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाने मंगळवारी सांगलीचे तापमान ४२.३ इतके दर्शविले. आगामी चार दिवस उष्म्याची ही लाट कायम राहणार असल्याने शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांनाही उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दुपारच्यावेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. सांगली, मिरज शहरातील अनेक रस्ते दुपारी एक ते चारपर्यंत शांत होते. विस्तारित विभागातील रस्त्यांवरही संचारबंदीसारखे चित्र होते. जिल्ह्यात यापूर्वी ६ मे १९९३ रोजी ४२.९ इतके विक्रमी तापमान नोंदले गेले होते. त्यापूर्वी १९७३ लासुद्धा तापमान ४३ अंश होते. मात्र १९९३ नंतर गेल्या २३ वर्षात कधीही पारा ४२ अंशावर गेला नव्हता. यावेळी हा पारा विक्रमाच्या जवळपास घुटमळत आहे. त्यामुळे लोकांना या तापमानाने हैराण केले आहे. (प्रतिनिधी)चर्चा तापमानावरवाढते तापमान आणि उन्हाच्या झळा हा आता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन तासागणिक तापमानाची माहिती घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पाण्याचे दुर्भीक्ष्य केवळ माणसांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. पशु-पक्ष्यांनाही याचे तीव्र चटके सोसावे लागत आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटताना प्राणी-पक्ष्यांनाही मैलोन् मैल भटकंती करावी लागत आहे. सांगलीतील कावळ्यांची पोटाची चिंता स्मशानभूमीत संपत असली तरी, पाण्यासाठी त्यांना धडपडावे लागतेच. शहरातील एका सार्वजनिक नळावर बुधवारी अनेक मिनिटांच्या प्रयत्नानंतर दोन कावळ्यांची तहान भागली...सांगाडे दुष्काळातले... : दुष्काळाची छाया गडद होत असताना, निष्पर्ण होणाऱ्या वृक्षांच्या सावल्या गायब होत आहेत. हिरवाई जाऊन झाडांचे सांगाडे उरताना, जनावरांची स्थितीही त्यांच्यासारखीच होताना दिसत आहे. मणेराजुरी येथील शेकोबा डोंगरावरील हे चित्रही तेच दर्शवित आहे.