शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा सांगलीत मोर्चा

By admin | Updated: June 25, 2016 00:48 IST

आंदोलनाची तीव्रता वाढविणार : ‘म्हैसाळ’चे कार्यालय स्थलांतर

सांगली : कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेचे सांगलीतील मंडळ कार्यालय यवतमाळला हलविण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील कॉँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी झालेल्या सभेत ‘वालचंद’मध्ये घुसून ताबा घेणाऱ्या खासदारांंना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप माजी खासदार प्रतीक पाटील यांनी केला. ताकारी व म्हैसाळ या दोन दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या योजना असून, यामुळे त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या दोन्ही योजनांचे काम अजूनही अपूर्ण असल्याने मंडळ कार्यालय सांगलीतच आवश्यक असताना शासनाने हे कार्यालय यवतमाळला स्थलांतर करण्याचे आदेश दिले असून, १ जुलैपासून कार्यालय स्थलांतरित होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात कॉँग्रेसने मोर्चा काढला. स्टेशन चौकातून निघालेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ताकारी योजनेचे अजूनही ३३०.७९ कोटींची कामे बाकी असून, ती पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता आहे, तर म्हैसाळ योजनेचेही ८१६९७ हेक्टर क्षेत्र असून, अद्यापही ४६८३५ हेक्टर म्हणजेच ५७ टक्के क्षेत्राचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. मुख्य कालव्याची कामे पूर्ण झाली असली तरी पोटकालव्याची व पुढील कालव्यांची कामे पूर्ण झालेली नसल्याने मंडळ कार्यालय सांगलीतून हलवू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिरज येथील सभेत ताकारी, म्हैसाळ योजनांना भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या जोरावरच जिल्ह्यात भाजपचे खासदार व आमदार निवडून आले आहेत मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आनंदराव मोहिते, शैलजा पाटील, माजी आ. हाफिज धत्तुरे, सुरेश शिंदे, प्रकाश कांबळे, संजय हजारे, सुभाष खोत, अण्णासाहेब कोरे, अमर पाटील, जत कॉँग्रेसचे पी. एम. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)