शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांविरोधात सांगलीकरांची खेळी

By admin | Updated: August 19, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणूक : इस्लामपुरात विरोधकांची दहीहंडी आज

अशोक पाटील - इस्लामपूर  -ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात फिल्डिंग लावल्यानंतर आता सांगलीतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना आयर्विन पूलच ओलांडू द्यायचा नाही, यासाठी इस्लामपूर मतदार संघातच त्यांना गुंतविण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. जयंतरावांचे कट्टर विरोधक नानासाहेब महाडिक यांना ताकद देण्यासाठी सांगलीकरांनी चंग बांधला आहे. या विरोधकांच्या अस्तित्वाची दहीहंडी उद्या (बुधवारी) इस्लामपुरात फुटणार आहे. महाडिक यांचे नाव जाहीर करुन जयंतरावांना धक्का देण्याचा बेत शक्तिप्रदर्शनातून होणार आहे. काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी मोदी लाटेची धास्ती घेतली आहे. त्यातच जिल्हाभरातील जयंतरावांचे शिलेदार भाजप, शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या भूमिकेतून जयंतरावांनी राजकीय खेळीस सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांनी इस्लामपूर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. जयंतरावांच्या विरोधात नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, सदाभाऊ खोत यांच्याबाबत चाचपणी झाली आहे. महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते. सर्वोदय कारखान्याच्या मालकीवरुन जयंतराव आणि भाजपचे आमदार संभाजी पवार यांच्यातील दरी रुंदावली आहे. त्यामुळे कसबे डिग्रज मंडलामध्ये महाडिक यांना ताकद देण्यासाठी आ. पवार व त्यांचे पुत्र पृथ्वीराज सरसावले आहेत. महाडिक हे वसंतदादा घराण्याचे नातेवाईक असल्याने दादा घराणेही छुप्या मार्गाने जयंतरावांविरोधात कार्यरत होण्याची शक्यता आहे. या शक्याशक्यतेने जयंतरावांनी सांगलीतील मदन पाटील आणि संभाजी पवार यांची ताकद संपविण्याचा ‘कार्यक्रम’ आखला आहे. महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातून इस्लामपुरात दरवर्षी मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दहीहंडीला शह देण्यासाठी जयंतराव गटाकडूनही दहीहंंडीचे आयोजन करण्यात येत होते. परंतु अलीकडील दोन वर्षात जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या दहीहंडीचे स्वरुप थंडावले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी दहीहंडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. त्यासाठी जयंतरावांच्या विरोधातील सर्वच नेते एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप नसल्याचे सांगितले जात असले तरी, इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीला पर्यायाने जयंतराव गटाला संपविण्यासाठीच दहीहंडी फोडली जाणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे.