शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकर नागरिकांच्या माथी अजूनही जड पाणीच..!

By admin | Updated: December 29, 2015 00:54 IST

सांगलीकर नागरिकांच्या माथी अजूनही जड पाणीच..! मिरजेत शून्य जडत्व : पाणी शुद्धीकरणाचा ढिसाळ कारभार

सांगली : महापालिकेकडून सांगलीतील नागरिकांना पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात ३.६ मिलिग्रॅम जडत्व आढळून आले आहे. याउलट मिरजेतील पाणी शुद्ध आहे. महापालिकेच्या शुद्धीकरण यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या माथी जड पाणी मारले जात आहे. सांगलीकरांच्या नशिबी नेहमीच दूषित पाणी आहे काय, अशी शंका उपस्थित होते. कधी शेरीनाल्याचे सांडपाणी नदीपात्रात मिसळते, तर कधी हिरव्या, पिवळ्या पाण्याचा पुरवठा होतो. नागरिकांना शुद्ध पाणी कधी मिळणार, ही समस्या सुटणार की नाही, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. गॅस्ट्रो, अतिसाराचे रुग्ण शहराच्या कानाकोपऱ्यात आढळून येत असतात. त्यावर जुजबी कार्यवाही होते आणि पुन्हा तशीच अवस्था सुरू राहते. त्यात आता पाण्याच्या जडपणाची भर पडली आहे. स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी रविवारी सांगली व मिरज शहरातील जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट दिली. या भेटीत पाटील यांना मिरजेतील पाण्यात जडपणा आढळून आला नाही. उलट सांगलीच्या पाण्यात मात्र ३.६० मिलिगॅॅ्रम जडपणा होता. या प्रकाराला शुद्धीकरण केंद्राचा ढिसाळ कारभारच कारणीभूत आहे. शासनाने पाण्यात तुरटी वापरास बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिकांना पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर व पीएसएल पावडर मिसळण्यात येत आहे. सांगलीत ही पावडर मिसळताना योग्य प्रमाण राखले जात नाही. किंबहुना त्याचे प्रमाणच माहीत नसल्याने वाट्टेल तशी ब्लिचिंग व पीएसएल पावडर टाकली जाते. त्यामुळेच सांगलीच्या पाण्यात ब्लिचिंंग पावडर, पीएसएल पावडर मिसळूनही जडत्वाचे प्रमाण ३.६० आहे. मिरजेतील पाण्याची तपासणी केली असता, तेथील जडपणा शून्य असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी) ...तरच मिळणार सांगलीला शुद्ध पाणी मिरजेत ब्लिचिंग व पीएसएल पावडर पाण्यात टाकण्यासाठी शास्त्रशुद्ध यंत्रणा आहे. सांगलीच्या जलशुद्धीकरण केंद्रात त्यासाठी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसे निर्देशही देण्यात आले आहेत. आता त्यावर कार्यवाही होऊन सांगलीकरांना किमान शुद्ध पाणी मिळेल, अशी आशा आहे.  

सांगलीच्या पाण्यात जडपणा आढळून आला आहे. त्यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाला ब्लिचिंग व पीएसएल पावडरचे प्रमाण योग्यरित्या राखण्याचे आदेश दिले आहेत. शुद्धीकरण यंत्रणेत किरकोळ दुरुस्ती केली, तर शून्य जडपणा येऊ शकतो. त्यादृष्टीने दुरुस्त्या सुरु आहेत. लवकरच सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा होईल. - संतोष पाटील, सभापती, स्थायी समिती.