शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकतेसाठी धावले सांगलीकर

By admin | Updated: October 31, 2014 23:47 IST

तरुणांचा सहभाग : अधिकारी, खेळाडू सहभागी; ‘रन फॉर युनिटी’ला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचा संदेश देत आज (शुक्रवार) सांगलीकर ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीमध्ये उत्साहाने धावले.जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये आज रन फॉर युनिटी अशी एकता दौड झाली. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधून रन फॉर युनिटी या एकता दौडीस प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, महापालिका आयुक्त अजिज कारचे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, डॉ. विजयकुमार शहा, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत आदि उपस्थित होते.या एकता दौडीच्या माध्यमातून आज सांगलीतील अबाल-वृध्द रस्त्यावर एकता आणि अखंडतेचा संदेश देत धावले. यामध्ये शालेय विद्यार्थी, तरूण-तरूणी, खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेऊन एकतेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रन फॉर युनिटी या एकता दौडीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांच्याहस्ते करण्यात आला. सुरुवातीला महापालिकेच्या क्रीडा अधिकारी मंगल फोंडे यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीस छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून प्रारंभ होऊन ही एकता दौड पुढे आमराई, वखारभाग, पटेल चौक, गणपती मंदिर चौक, टिळक चौक, हरभट रोड, राजवाडा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आली आणि तेथे या एकता दौडीचा समारोप जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या मनोगताने करण्यात आला. यावेळी अजिज कारचे, डॉ. विजयकुमार शहा यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, शिक्षणाधिकारी एम. आर. यादव, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा उपनिबंधक एस. एन. जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)