शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकतेसाठी धावले सांगलीकर

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

तरुणांचा सहभाग : अधिकारी, खेळाडू सहभागी; ‘रन फॉर युनिटी’ला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचा संदेश देत आज (शुक्रवार) सांगलीकर ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीमध्ये उत्साहाने धावले.जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये आज रन फॉर युनिटी अशी एकता दौड झाली. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधून रन फॉर युनिटी या एकता दौडीस प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, महापालिका आयुक्त अजिज कारचे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, डॉ. विजयकुमार शहा, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत आदि उपस्थित होते.या एकता दौडीच्या माध्यमातून आज सांगलीतील अबाल-वृध्द रस्त्यावर एकता आणि अखंडतेचा संदेश देत धावले. यामध्ये शालेय विद्यार्थी, तरूण-तरूणी, खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेऊन एकतेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रन फॉर युनिटी या एकता दौडीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांच्याहस्ते करण्यात आला. सुरुवातीला महापालिकेच्या क्रीडा अधिकारी मंगल फोंडे यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीस छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून प्रारंभ होऊन ही एकता दौड पुढे आमराई, वखारभाग, पटेल चौक, गणपती मंदिर चौक, टिळक चौक, हरभट रोड, राजवाडा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आली आणि तेथे या एकता दौडीचा समारोप जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या मनोगताने करण्यात आला. यावेळी अजिज कारचे, डॉ. विजयकुमार शहा यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, शिक्षणाधिकारी एम. आर. यादव, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा उपनिबंधक एस. एन. जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)स्वच्छतेला महत्त्व देण्याचे आवाहन देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी संपूर्ण समाजाने सज्ज राहण्यासाठी स्वत:ला समर्पित करुन देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्याकामी सहाय्यभूत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुशवाह यांनी केले. स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी देशस्तरावर स्वच्छ भारत मिशन सुरु असून आपल्या जिल्ह्यातही स्वच्छतेची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक, सामूहिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व द्यावे. उघड्यावर कचरा टाकणार नाही अशी शपथ घेऊन प्रत्येकाने आपले घर, परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा. राष्ट्रध्वजाचा आदर राखावा, असे आवाहनही कुशवाह यांनी यावेळी केले.