शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पुतळा बसविल्याने सांगलीत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील झुलेलाल चौकातील आयलॅँडमध्ये राष्ट्र विकास सेनेने सोमवारी मध्यरात्री लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसविला. सिंधी समाजाने हा पुतळा हटविण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून राष्टÑ विकास सेनेचे राज्याध्यक्ष आमोस ...

ठळक मुद्देसिंधी समाजाने हा पुतळा हटविण्याची मागणी केल्याने तणाव
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील झुलेलाल चौकातील आयलॅँडमध्ये राष्ट्र विकास सेनेने सोमवारी मध्यरात्री लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसविला. सिंधी समाजाने हा पुतळा हटविण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून राष्टÑ विकास सेनेचे राज्याध्यक्ष आमोस मोरे यांच्यासह ३३ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आमोस मोरे, सुधाकर गायकवाड, फिरोज खान, वर्षा काळे, आशा पवार, शाहरूख खतीब, सॅमसन मोरे, रोहन कोळी व २० ते २५ अनोळखींचा समावेश आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. बेकायदा जमाव जमवून, महापालिका व जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसूवन अतिक्रमण केले; तसेच आयलॅँडचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाटेगाव (ता. वाळवा) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची मंगळवारी जयंती साजरी करण्यात आली. तत्पूर्वी रविवारी मध्यरात्री विविध संघटनांनी कर्मवीर चौकातील जिल्हा बँकेसमोरील बागेत पुतळा बसविला होता. त्यानंतर राष्टÑीय विकास सेनेनेही झुलेलाल चौकातील आयलॅन्डमध्ये सोमवारी मध्यरात्री पुतळा बसविला. या दोन्ही ठिकाणी सोमवारी अण्णा भाऊंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यासाठी गर्दी होती. राष्टÑीय विकास सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, झुलेलाल चौकात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी अनेक मागासवर्गीय पक्ष संघटनांची मागणी होती. पण शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. यासाठी आंदोलन करून निवेदनही दिले. मात्र निवेदनास नेहमीच केराची टोपली दाखविली. आमचा हक्क हिरावला जात असल्याने आम्ही अण्णा भाऊंचा पुतळा बसवून हक्क स्वत: मिळविला आहे. आमच्याकडून इतर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो. हा पुतळा हलविण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास प्रखर विरोध केला जाईल. या पत्रकावर आमोस मोरे यांच्यासह सेनेच्या ११ पदाधिकाºयांच्या सह्या आहेत. झुलेलाल चौकात अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्यास सिंधी समाजाने विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दिवसभर होता. पोलिस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक व राखीव पोलिसांचे पथकही तैनात केले होते.