शीतल पाटील ल्ल सांगलमहापालिका हद्दीतील दोन हजारहून अधिक खोकीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, सांगलीतील स्टेशन चौकातील ४०० गाळ्यांच्या वादाला तोंड फुटले आहे. खोकीधारकांनी हे गाळे कायमस्वरुपी ताब्यात देण्याची मागणी लावून धरली आहे, तर महापालिका कायद्यात एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी करारपत्र करता येत नाही. त्यातच सत्ताधारी काँग्रेसने २९ वर्षे कालावधीसाठी करारपत्र करण्याचा ठराव केला आहे. त्यालाही खोकीधारकांचा विरोध आहे. त्यातून सत्ताधारी व खोकीधारकांत संघर्ष निर्माण झाला आहे. गेली सहा वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले खोकीधारकही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सांगलीत खोक्यांचा संघर्ष नव्या वळणावर
By admin | Updated: July 4, 2014 00:47 IST