शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शिवप्रतिष्ठान फुटीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

चौगुले समर्थकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी ...

चौगुले समर्थकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी निलंबित केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबाबत चर्चा, विनिमय करून मार्ग काढण्यासाठी रविवारी (दि. २१) शिवभक्तांचा मेळावा आयोजित केला आहे. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात नितीन चौगुले मित्रमंडळातर्फे हिंदुत्ववादी शिवभक्त एकत्र येणार आहेत.

गेली दोन दशके नि:स्वार्थी भावनेने भगव्या ध्वजाची सेवा करणारे नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून विनाकारण तडकाफडकी काढून टाकण्याची बाब हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे. गडकोट मोहीम, दुर्गामाता दौड, बलिदान मास, भक्ती-शक्ती संगम अशा अनेक विधायक उपक्रमांत नितीन चौगुले आघाडीवर आहेत. शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर हिंदुत्ववादी युवकांचे तगडे संघटन उभे केले आहे. भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गेली त्यांनी २० वर्षे नि:स्वार्थीपणे कार्य केले. असे असताना नितीन चौगुलेंसारखा कडवट हिंदुत्वाचा पुरस्कर्ता व शिवशंभू मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीस संघटनेतून हटवणे हे सयुक्तिक वाटत नाही, असे मत चौगुले समर्थकांनी यात व्यक्त केले आहे.

शिवभक्तांच्या या मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या माध्यमातून कारवाईस आव्हान दिले गेल्याने शिवप्रतिष्ठान संघटनेत फूट पडणार की काय, असा सवालही उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चौगुले यांच्यावरील कारवाईमुळे सांगलीतील वातावरण तापले आहे.

चौकट

चौगुलेंच्या भूमिकेकडे लक्ष

शिवभक्तांच्या मेळाव्यात नितीन चौगुले अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहेत. याच बैठकीत ते पुढील भूमिकाही मांडणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

चौकट

नेमकं काय घडतंय संघटनेत

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी काही दिवसांपूर्वी चौगुले यांना संघटनेतून काढल्याची माहिती दिली.

चौगुले यांच्याबद्दल दोन वर्षांपासून तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अद्याप संघटनेकडून कारणांचा खुलासा केला नाही

दुसरीकडे चौगुले समर्थक शिवभक्तांनी संताप व्यक्त करीत वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे.

त्यांच्या भूमिकेवर संघटनेतील फुटीचे चित्र अवलंबून राहणार आहे.