शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सांगली महापालिकेच्या नव्या महापौरांची निवड १८ ला; हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:48 IST

सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर, उपमहापौरांची निवड शनिवारी (दि. १८) होणार आहे. निवडीचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, महापौरपदासाठी नूतन सत्ताधारी भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या असून, कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. नूतन सभागृहात ...

सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर, उपमहापौरांची निवड शनिवारी (दि. १८) होणार आहे. निवडीचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, महापौरपदासाठी नूतन सत्ताधारी भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या असून, कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. नूतन सभागृहात भाजपचे ४१, काँग्रेसचे २०, राष्ट्रवादीचे १५, तर स्वाभिमानी आघाडीचा एक व अपक्ष एक, असे सदस्य आहेत. दोन्ही काँग्रेसने निवडणुकीसाठी आघाडी केली होती. पण त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल १३ आॅगस्टला संपणार आहे. त्यानंतर महापालिकेची सूत्रे नवे सत्ताधारी असलेल्या भाजपकडे जातील.दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव विभागाने १८ आॅगस्ट रोजी महापौर निवड करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. या निवड कार्यक्रमाला तात्काळ मान्यता मिळावी, यासाठी नगरसचिव के. सी. हळिंगळे स्वत: पुण्याला रवाना झाले आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला बुधवारी विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळेल व अर्ज भरण्याचा कार्यक्रमही जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. निवडीआधी तीन दिवस महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करावे लागतील. त्यात १५ आॅगस्ट सुटीचा दिवस असल्याने १४ आॅगस्ट रोजीच अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल, असे सूत्रांनी सांगितले.नूतन महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदासाठी भाजपमधून सविता मदने, उर्मिला बेलवलकर, संगीता खोत, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, गीता सुतार यांची नावे चर्चेत आहेत, तर उपमहापौर पदासाठी प्रकाश ढंग, निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी यांच्या नावांची चर्चा आहे. याबाबतचा निर्णय महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील व भाजपच्या कोअर कमिटीकडून घेतला जाणार आहे.झेंडावंदनाचा मुहूर्त टळला१५ आॅगस्ट रोजी नूतन महापौरांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांचा होता. त्यासाठी १४ आॅगस्ट रोजीच महापौर निवड घ्यावी, असा प्रयत्न दोन दिवसांपासून सुरू होता. त्यात नूतन सदस्यांचे गॅझेटचे काम सोमवारी पूर्ण झाले. मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळाली तरी, निवडणूक कार्यक्रमाला अपेक्षित कालावधी मिळणार नव्हता. ही बाब प्रशासनाने भाजप नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर भाजप नेत्यांनी १८ आॅगस्टच्या मुहूर्ताला मंजुरी दिली. परिणामी झेंडावंदनाचा मुहूर्त टळला.काँग्रेसचीही बैठकविरोधी पक्षनेते निवडीसाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांचीही बैठक होत आहे. या बैठकीस आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील नगरसेवकांतून मते आजमावणार आहेत. या पदासाठी उत्तम साखळकर, महापौर हारुण शिकलगार यांची नावे चर्चेत आहेत; तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाचा फैसला जयंत पाटील घेणार आहेत.८ नगरसेविका इच्छुकमहापौर, उपमहापौरपदासंदर्भात बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य, नूतन नगरसेवक उपस्थित राहणार आहे. महापौर निवड पहिले लक्ष्य असून, हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. आठ महिला इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार, यावर बैठकीत खल रंगणार आहे. महापौरपदाची संधी देताना अन्य शहरांचा समतोल साधत गटनेते, उपमहापौर, स्थायी समिती पदांच्या संधीवरही चर्चा होणार आहे.