शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेची नोकरभरती लटकली

By admin | Updated: September 12, 2016 00:21 IST

प्रतीक्षा कायम : प्रक्रिया रेंगाळली

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील प्रस्तावित नोकर भरतीबाबत राज्यस्तरीय कृती समितीची (एसएलटीपी) बैठक होऊनही अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नाही. सहकार विभागाकडील प्रक्रिया रेंगाळल्याने भरतीची प्रक्रियाही लटकली आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा बँकेला लागली आहे. जिल्हा बँकेचा १ हजार ४४२ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव यापूर्वी नाबार्ड व सहकार आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी होऊन त्याला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा जिल्हा बँक प्रशासनाला तसेच पदाधिकाऱ्यांना लागली असतानाच, पुन्हा नवे पत्र दाखल झाले होते. प्रत्येकवेळी काही तरी बदल होऊन येत असल्यामुळे नोकर भरती लांबणीवर पडली आहे. आता नव्या आकृतीबंधानुसार प्रस्ताव दाखल झाला असून, यासंदर्भात राज्य कृती समितीची बैठकही पार पडली. तरीही त्यापुढे प्रस्ताव गेलेला नाही. याबाबत बँकेचा पाठपुरावा सुरू असला तरी, सहकार विभागाकडे ही प्रक्रिया रेंगाळली आहे. नोकर भरतीचा प्रश्न सोडविताना बॅँकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करण्यात येणार असून, त्यानुसार नोकर भरतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या किती जागांना मंजुरी मिळणार, याकडेही बॅँकेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संपूर्ण कामकाज नऊशे लोकांवर सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत बँकेचे कर्मचारी बळ अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे नोकरभरती झाली, तर कामाचा ताण कमी होऊन त्याचा बँकेच्या आर्थिक उलाढालीस फायदा होऊ शकतो.