शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘धूम स्टाईल’ने अडीच तोळ्यांचे गंठण लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST

सांगली : शहरातील खणभागातील बिरंगे गल्लीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ‘धूम स्टाईल’ने महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण हिसडा मारून लांबविले. ...

सांगली : शहरातील खणभागातील बिरंगे गल्लीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ‘धूम स्टाईल’ने महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण हिसडा मारून लांबविले. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. साक्षी सूरज बसणवकर (२६, रा. कडलास्कर गल्ली, खणभाग) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

साक्षी बसणवकर खणभागातील कडलास्कर गल्लीत राहतात. सोमवारी सकाळी त्या दिरासोबत सासूकडे निघाल्या होत्या. भारत चौकातून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन चोरटा आला. त्याने साक्षी यांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास केले. साक्षी यांनी आरडाओरड केल्याने चोरट्याने धूम ठोकली. परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भरवस्तीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.