शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची क्रिकेटपटू स्मृती आता कोरोनाविरुद्ध जनजागृतीच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नागरिकांनी सहाकर्य करावे म्हणून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नागरिकांनी सहाकर्य करावे म्हणून जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. तरीही बेबंद होऊन रस्त्यावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना थोपवायचे कसे, हा प्रश्न कायम आहे. प्रशासनाच्या मदतीसाठी सांगलीची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आता पुढे सरसावली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन स्मृतीने केले आहे. ती म्हणते, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तिला थोपविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या. आजही अनेक जण अनावश्यकरीत्या घराबाहेर पडतात. अनेक जण मास्कचा वापर व्यवस्थितपणे करत नाहीत. मास्क गळ्यात अडकवून फिरताना दिसतात. चला, आज आपण सगळे निश्चय करू या. मी जबाबदार, मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार कोरोनाला हरवणार. मी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणार. वारंवार हात धुणार, सॅनिटायझरचा वापर करणार, सामाजिक अंतर पाळणार, कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणार आणि कोरोनावर मात करणार. स्मृतीने असेही आवाहन केले की, कोविडसाठीची लस पूर्णत: सुरक्षित आहे. शासनाच्या सूचनांनुसार १८ वर्षांवरील सर्वांनी ती घेतली पाहिजे. आपण सुरक्षित राहिलो, तरच देश सुरक्षित राहील. आपण सारे प्रशासनाला साथ देऊ या, कोरोनाला फैलावण्यापासून रोखू या.