शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बेड मिळविण्यासाठी कोरोनाबाधितांची सांगली - मिरजेत दिवसभर वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

सांगलीत भारती रुग्णालयाबाहेर गुरुवारी दुपारी कोरोना रुग्ण रुग्णवाहिकेतच ऑक्सिजन घेत बेड मिळण्याची प्रतीक्षा करत होते. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली ...

सांगलीत भारती रुग्णालयाबाहेर गुरुवारी दुपारी कोरोना रुग्ण रुग्णवाहिकेतच ऑक्सिजन घेत बेड मिळण्याची प्रतीक्षा करत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाग्रस्तांसाठी बेड उपलब्धतेबाबतीत जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ लागली आहे. नवनवी कोरोना रुग्णालये सुरु होत असली तरी दररोजची रुग्णसंख्यादेखील हजारावर जात आहे. त्यामुळे ऑक्सिजन लावून बेड शोधत फिरणारे रुग्ण सांगली - मिरजेत दिसू लागले आहेत.

व्हेंटिलेटर बेडबाबत सर्वत्र गंभीर स्थिती आहे. ऑक्सिजन बेडदेखील उपलब्ध नसल्याचे कोरोना रुग्णालयांत सांगितले जात आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या स्थितीनुसार जिल्हाभरातील ६९ कोरोना रुग्णालयांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात फक्त २३ बेड उपलब्ध होते. जनरल वॉर्डमध्ये ६८९ बेड शिल्लक होते. अतिदक्षता विभागात कुपवाडमध्ये संजीवनी, दुदनकर, सांगलीत संस्कृती, कडेगावमध्ये श्वास, स्पंदन, पलूसमध्ये डॉक्टर्स कोविड, इस्लामपुरात प्रकाश रुग्णालय, आष्टा येथे धन्वंतरी, विट्यामध्ये स्वस्तिक येथेच बेड शिल्लक होते. अतिदक्षतामध्ये जिल्ह्यात एकूण ७३० बेड आहेत. त्यापैकी ७०७ बेड भरले आहेत.

जिल्हा प्रशासनाने खाटांच्या उपलब्धतेच्या माहितीसाठी पोर्टल सुुरू केले आहे. पण, त्यातील माहितीनुसार रुग्णालयांत बेड उपलब्ध नसल्याचा अनुभ‌व येत आहे. रुग्णालये किंवा प्रशासनाकडून पोर्टल वेळच्या वेळी अपडेट केले जात नसल्याचा त्रास रुग्णांच्या नातेवाईकांना सोसावा लागत आहे. रुग्णवाहिकेत अत्यवस्थ रुग्णाला घेऊन रुग्णालयात बेडसाठी फिरणारे नातेवाईक दररोज दिसत आहेत. काही रुग्णालयांनी तर बेड उपलब्ध नसल्याचे थेट फलकच लावले आहेत.

चौकट

लस टंचाईनंतर आता प्राणवायू संकट

जिल्ह्यात लसीचा खडखडाट असताना आता प्राणवायूच्या टंचाईचाही सामना रुग्णालयांना करावा लागत आहे. मिरजेतील काही खासगी रुग्णालयांत शुक्रवारी दुपारी बेड उपलब्ध होते. पण, ऑक्सिजन संपल्याने रुग्ण दाखल करुन घेण्यात आले नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतही ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना सांगली-मिरजेला धाडले जात आहे.

चौकट

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

- जिल्हाभरात ६९ कोविड रुग्णालये

- अतिदक्षताचे एकूण बेड - ७३०

- गुरुवारी दुपारी अतिदक्षतामध्ये उपलब्ध बेड - २३

- जनरल वॉर्डमध्ये एकूण बेड - २७००

- जनरल वॉर्डमध्ये गुरुवारी उपलब्ध बेड - ५२६