शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावच्या नगराध्यक्षपदी संगीता राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी संगीता राजेंद्र राऊत यांची, तर उपनगराध्यक्षपदी दिनकर चंदर जाधव यांची बिनविरोध ...

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी संगीता राजेंद्र राऊत यांची, तर उपनगराध्यक्षपदी दिनकर चंदर जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

कडेगाव नगरपंचायतीवर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे वर्चस्व आहे. कडेगावचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. येथील नगराध्यक्षा नीता देसाई आणि उपनगराध्यक्ष राजू जाधव यांनी ठरलेली मुदत संपल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी निवड प्रक्रिया झाली. नगराध्यक्ष पदासाठी संगीता राऊत यांचा आणि उपनगराध्यक्ष पदासाठी दिनकर जाधव यांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदांसाठीची निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्यासह कडेगाव येथील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नूतन नगराध्यक्षा संगीता राऊत व उपनगराध्यक्ष दिनकर जाधव यांचे अभिनंदन केले.