शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील संमेलनात ‘सखीं’ची धम्माल

By admin | Updated: January 2, 2015 00:08 IST

मावळत्या २०१४ ला संमेलनाच्या माध्यमातून सखींनी निरोप दिला.

सांगली : ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित ‘सखी संमेलना’स महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील भावे नाट्य विद्या मंदिरात आयोजित केलेल्या संमेलनात सहभागी सखींनी फॅशन शो, फनिगेम्स आणि नृत्य या माध्यमातून कलाविष्कार सादर केला आणि अक्षरश: धम्माल केली. मावळत्या २०१४ ला संमेलनाच्या माध्यमातून सखींनी निरोप दिला. ‘लोकमत’ सखी मंचतर्फे वर्षभरात विविध मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यास महिलांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत होता. मंगळवारी सांगलीत झालेल्या सखी संमेलनास चांगला प्रतिसाद लाभला. दुपारी २ वाजल्यापासूनच सखींची पावले नाट्यगृहाकडे वळत होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले होते. गणेशवंदनेने संमेलनास प्रारंभ झाला. यानंतर ड्युएट, सोलो आणि ग्रुप या प्रकारातील नृत्यप्रकार सखींनी सादर केले. फॅशन शो आणि फनिगेम्स यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक कलाविष्काराला नाट्यगृहात बसलेल्या सखींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सायंकाळी संमेलनाचा समारोप झाला. संमेलनात आयोजित विविध कार्यक्रमांत तृप्ती फराटे, वैशाली खटके, उल्का पाटील, शुभांगी पाटील, वैशाली कोरे, रेखा सरनोबत, नीशा करवाडे, तेजस्विनी मोहिते, मधुरा महामुनी, जया जोशी, मंजुषा जोशी, योगिनी करगणीकर, वंदना पाटील, सायली कुलकर्णी, गौरी फडके, सुजाता पाटील, मृण्मयी जोगळेकर, जोत्स्ना मुळगुंद, विद्या शिंदे, राणी सरस्वती कन्या शाळेच्या सोनाली तेली, रुचिता घाटगे, कोमल परदेशी, सायली परदेशी, प्रज्ञा डवरी, सलोनी जमदाडे, पूनम करांडे, नेहा पाटील, पल्लवी पाटील, गीतांजली देसाई, विमल शेट्टी, वर्षा चौगुले, जयश्री माने, लता कुचीकर, भारती माणकापुरे, पूजा कुलकर्णी, साधना माळी, स्मिता पाटील आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)