शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सई बनली पालिकेची स्वच्छता दूत

By admin | Updated: October 6, 2015 00:35 IST

सई ही मूळची सांगलीची असून तिचे शिक्षण सांगलीत झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांत तिचा सहभाग असावा, या उद्देशाने तिची निवड करण्यात आली.

सांगली : महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची दूत म्हणून मराठी चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिची निवड करण्यात आली आहे. सई ताम्हणकर हिनेही स्वच्छतादूत म्हणून काम करण्यास मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने राज्यस्तरीय स्पर्धेत नेहमीच अव्वल क्रमांक पटाकाविला आहे. शहरी स्वच्छता अभियानात पालिकेची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. आतापर्यंत महापालिकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महापालिकेच्या यंत्रणेमार्फत स्वच्छतेचे काम सुरूच आहे. या अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून स्वच्छतेच्या कामाचे बँ्रड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून प्रख्यात अभिनेत्री सई ताम्हणकर हिची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकर हिची मुंबईत भेट घेऊन, महापालिकेसोबत स्वच्छतेच्या कामात सहभाग घेण्याची विनंती केली होती. त्याला तिने मान्यता दिली आहे, असेही पाटील यांनी सांगितले. सई ही मूळची सांगलीची असून तिचे शिक्षण सांगलीत झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांत तिचा सहभाग असावा, या उद्देशाने तिची निवड करण्यात आली. सध्या ती चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून पुढील आठवड्यात ती मुंबईत परतणार आहे. तेव्हा पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी तिची भेट घेऊन स्वच्छतेबाबतचा आराखडा तयार करतील. नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी सईसह रॅली, स्वच्छता अभियान राबविण्याचा विचार आहे. शिवाय तिच्या मार्गदर्शनाखाली एखादा प्रभाग आदर्श मॉडेल तयार करण्याचा मानस असल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)