इन्ट्रो
कराड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांत सुुबत्ता आली. सन १९६०मध्ये रेठरे बुद्रुक येथे तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी जयवंतराव भाेसले यांच्या अथक प्रयत्नाने कृष्णाकाठ सर्वार्थाने समृद्धीच्या शिखरावर पोहोचला. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने या परिसरात विकासाचे नवे पर्व सुरू झाले.
कृष्णा कारखान्याच्या स्थापनेपासून रेठरे बुद्रुक गावचे सुपुत्र जयवंतराव भाेसले यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथमत: उपसा जलसिंचन योजनांना गती दिली. त्यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आली. जवळजवळ ९० टक्के क्षेत्र ऊस पिकाखाली गेले. तेव्हापासून या परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन सुखी झाला. यासाठी जयवंतराव भाेसले यांनी प्राणपणाने काम केले. आता त्यांचा वारसा डॉ. सुरेश भाेसले आणि त्यांचे चिरंजीव डॉ. अतुल भाेसले यांनी चालविला आहे.
सुरेश भाेसले हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहे. सन २०१५मध्ये कारखान्याच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. त्यावेळी कृष्णा आर्थिक डबघाईस आला होता. भाेसले यांच्या नियोजनबद्ध व पारदर्शक कारभाराने कृष्णेला पुन्हा सुवर्णझळाळी आली. सुरेश भाेसले यांनी आपल्या कारकिर्दीत कारखान्याच्या कार्यप्रणालीत आमुलाग्र बदल केले. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सर्वाधिक दर, मोफत साखर, कारखान्याचे अत्याधुनिकरण, ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘जयवंत आदर्श ऊस विकास योजना’ अशा विविध योजना राबविल्या. ऊस तोडणीत होणारे घोटाळे यावर उपाय म्हणून अत्याधुनिक पद्धतीने तोडणी यंत्रणा अमलात आणली. ऊस उत्पादक सभासदांना त्याच्या घामाचे मोल मिळावे म्हणून कारखान्याच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रात विविध उद्योग उभे करून रेठरे परिसरात सहकाराची पंढरी उभी केली. या पंढरीतील आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना अद्ययावत कृषी शिक्षण मिळावे, यासाठी कृषी महाविद्यालय उभे केले. याच महाविद्यालयात परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सहकार क्षेत्रातील विविध संस्था उभ्या करून याद्वारे शेतीसाठी लागणाऱ्या विविध उत्पादनांना चालना दिली. त्यामुळेच ऊस उत्पादक सभासदांचा फायदा झाला. डॉ. सुरेश भाेसले यांच्या मार्गदर्शनामुळेच सहकार पंढरी असलेला कृष्णा कारखाना सक्षमपणे उभा आहे.
कृष्णेची ठळक वैशिष्ट्ये
१) १२.७० टक्के हा दहा वर्षातील उच्चांकी साखर उतारा.
२) ३२२०.४० रुपये उच्चांकी दर.
३) एका वर्षात १५ लाख २१ हजार ६५ क्विंटल विक्रमी उत्पादन.
४) १२६ कोटी कर्जाची परतफेड.
५) मोबाईल अॅपद्वारे ऊस लागणची नोंद.
६) तोडणी यंत्रणेत पारदर्शकता, सुसूत्रता व आर्थिक बचत.
७) डिस्टिलरीचे आधुुनिकीकरण
-अशोक पाटील, इस्लामपूर