शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ, सत्ता कधी कायम नसते!

By admin | Updated: January 2, 2017 23:30 IST

जयंत पाटील : मंत्रीपदाची शिफारस करण्यासाठी केलेले फोन विसरले

तांदुळवाडी : नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीने शेतीमालाचे दर कोलमडून सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. असे असताना शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे नेते सत्तेत मश्गुल झाले आहेत, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा़ राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. सदाभाऊ आता माझ्यासह राजारामबापूंवर बोलू लागले आहेत़ सत्ता कधी कायम नसते आणि मंत्री करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करा, असे त्यांनी मला केलेले फोन ते विसरलेले दिसतात, असा टोलाही त्यांनी मारला़ बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आ़ पाटील यांच्याहस्ते २ कोटी २६ लाखांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे अध्यक्षस्थानी होते़ जि़ प़ उपाध्यक्ष रणजित पाटील, देवराज पाटील, बी़ के. पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील पुढे म्हणाले, या जि. प़ मतदार संघात पंचायत समितीची जागा मिळाली, मात्र जि़ प़ ची जागा गेलेली आहे़ सध्या मतदारसंघात अनेकजण आपणास मदत करणार आहेत़ उमेदवार सर्वांच्या मान्यतेने ठरवू. मात्र उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. तुमचा एकमेकावरील राग काढण्यात मला त्रास होतो़ सध्या कोणत्याही पक्षात माझा पराभव करू शकतात, असा विश्वास नाही़ त्यामुळेच ते सर्व तत्त्वांना मुरड घालून एक होत आहेत. मात्र पतंगराव कदम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत़ ते जातीयवादी पक्षांशी आघाडी करतील, असे वाटत नाही़ बी़ के. पाटील, सरपंच विलासराव देसावळे, पंचायत समिती सदस्या सौ़ शोभाताई देसावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी एम़ बी़ हताळे, राष्ट्रीय कबड्डीपटू अनिकेत बेनाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते भूपाल घोरपडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.माजी सरपंच बाजीराव जाधव यांनी प्रास्ताविक केले़ राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव पाटील, युवक अध्यक्ष संजय पाटील, ढवळीचे शरद पाटील, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक दिलीपराव पाटील, अ‍ॅड़ विश्वासराव पाटील, बाबासाहेब पाटील, जालिंदर जाधव, संपतराव पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते़ माजी पं़ स़ सदस्य बाजीराव बेनाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)