-------------
औषध फवारणी
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे ज्या गावात कोरोना रुग्ण सापडतात त्या भागात जंतुनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. सर्व ग्रामपंचायतींनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
--------------------
खरिपासाठी बियाणांचे नियोजन सुरू
सांगली : आगामी खरीप हंगामात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. विविध ठिकाणी बैठका घेऊन शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले जात आहे. बियाणे उगवण क्षमता तापसणीबाबतही माहिती दिली जात आहे. तसेच घरातील बियाणांचा वापर करण्यासाठीही सांगितले जात आहे.
------------
विद्युततारांचा धोका
सांगली : गत कही दिवसांमध्ये जिल्ह्यात वादळी पावसाने नुकसान केले आहे. यात विद्युततारांचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ज्या ठिकाणी विद्युततारा धोक्याच्या अवस्थेत आहेत; शिवाय झाडांच्या फांद्यामुळेही तारा तुटत आहेत, अशा ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे. धोकादायक तारांच्या ठिकाणी वेळीच दुुरुस्ती केल्यास दुर्घटना होणार नाहीत.
----------------------
दुधगाव-कवठेपिरान रस्त्याचे काम सुरू
दुधगाव : मिरज तालुक्यातील कवठेपिरान ते दुधगाव या रस्त्यावर सध्या खडीकरणाचे काम सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गत काही दिवसांत रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होते. यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. काम सुरू झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
--------