शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहारात त्रुटींची गर्दी

By admin | Updated: December 26, 2014 00:13 IST

ठेकेदार नामानिराळा : मध्यवर्ती स्वयंपाकघर संकल्पनेची गरज

सांगली : उद्देश चांगला असूनही अनेक त्रुटींची गर्दी झाल्याने शालेय पोषण आहाराला वादाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात निकृष्ट धान्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्यानंतरही या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. छोट्या गावांमधील मोजक्याच शाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर संकल्पनेसह अनेक चांगल्या गोष्टी योजनेत समाविष्ट करून खऱ्याअर्थाने ही योजना आदर्शवत करता येऊ शकते. मात्र त्याबाबत शासकीय पातळीवर प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. शालेय पोषण आहारातील पुरवठा करणारी यंत्रणाच सदोष असल्याने त्याचे परिणाम पुढील यंत्रणेला भोगावे लागतात. शासकीय पातळीवरही केवळ शासकीय आदेशाचेच पालन करण्याबाबत धन्यता मानण्यात येते. योजनेतील त्रुटी दूर करून पोषण आहाराचा एक चांगला पॅटर्न राज्यभर आणि देशभर देण्यासाठी स्थानिक प्रशासनाची कधीच धडपड दिसत नाही. चाकोरीबध्द कामात ते व्यस्त असल्यामुळे वारंवार विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ होत आहे. पंचनामे करायचे, आदेश द्यायचे आणि पडदा टाकायचा, या गोष्टींपुरतीच कारवाईची चक्रे फिरतात. पुढे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ चालू होते. (प्रतिनिधी)मुख्याध्यापकच बळी पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांची मुक्तता करण्यात आल्याचा गवगवा झाला. प्रत्यक्षात आजही चव, वजन, उंची या रजिस्टरांबरोबरच देयकाची कागदपत्रे यात चूक झाल्यास मुख्याध्यापकांनाच बळीचा बकरा बनविले जाते. मध्यवर्ती स्वयंपाकगृह संकल्पनेची गरजछोट्या गावांमध्ये एकच मध्यवर्ती स्वयंपाकगृह करून त्या ठिकाणाहून काही मिनिटातच सर्व शाळांमध्ये शिजविलेले गरम अन्न पोहोचविले जाऊ शकते. यामुळे एकाचवेळी सर्वत्र खर्च होणारे मनुष्यबळ, पैशाचा अपव्यय या गोष्टी थांबविता येऊ शकतात. शासनाचाच यात आर्थिक फायदाही होऊ शकेल. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आहार पुरविण्यासाठी ठेकेदारांच्या अल्प प्रतिसादाचा प्रश्नही निकालात निघेल. योजनेतील अडचणी दूर करुन शिस्तबद्धतेची आवश्यकतागोदामातून धान्य उचलतानाच दर्जा तपासणी यंत्रणा नाहीनिकृष्ट मालाबाबत पंचनामा पथक नाहीभाजी शिजविण्याचे अनुदान वेळेत नाहीवजन मापनात अजूनही इलेक्ट्रॉनिक काट्याची सोय नाहीमसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण अत्यल्पपारदर्शीपणाचा अभावप्रशासनाचेही योजनेकडे दुर्लक्ष होत आहेमाल खराब का होतो?बऱ्याचदा शाळेमध्ये माल उतरविताना तो चांगला असतो. त्यामुळे तो स्वीकारला जातो. प्रत्यक्षात १५ दिवसातच तो खराब होतो. यामागचे कारण तपासून त्याबाबत सुधारणा करण्यासाठी आजवर कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. नव्वद टक्के शाळांमध्ये गोदाम व स्वतंत्र स्वयंपाक गृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे साठवणूक आणि स्वयंपाकगृह याबाबतची तजवीज करण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत.