शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दर साठ रुपयांवर : मिरज तालुक्यातील उत्पादकांच्या आशा पल्लवीत

By admin | Updated: July 16, 2014 23:40 IST

कलकत्ता झेंडूला ‘मुंबई’ने सावरले!

प्रवीण जगताप- लिंगनूर मिरज तालुक्यातील झेंडू उत्पादकांच्या आशा सध्या पल्लवीत झाल्या आहेत. दसरा, दिवाळीच नव्हे, तर बारमाही झेंडू उत्पादन घेणारे उत्पादकही या परिसरात तयार झाले आहेत. सध्या कलकत्ता झेंडूला २४ रुपयांवरून मुंबई मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये किलोला दर मिळू लागल्याने झेंडू उत्पादकांतून समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. मिरज तालुक्यात मिरज पश्चिम भागात अ‍ॅरागोल्ड व कलकत्ता या जातीच्या झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तालुक्याचा पश्चिम भाग हा संकरित झेंडू उत्पादनाचा बालेकिल्ला आहे. मात्र झेंडू फुलाला मिळणाऱ्या मुंबई मार्केटचा अभ्यास करून मिरज पूर्व भागातही मल्लेवाडी, एरंडोली व आता लिंगनूर येथेही झेंडूचे प्लॉट करून प्रयोगशील व अल्पमुदतीच्या नगदी पिक ांचा प्रयोग येथील प्रयोगशील शेतकरी करू लागले आहेत.देशी फुलांना बहर एकदाच मोठ्या प्रमाणावर येतो व एकदाच मोठी तोड करता येते. मात्र कलकत्ता व अ‍ॅरागोल्ड या संकरित जातीच्या झेंडूला दर पाच दिवसांनी तोड घेणे शक्य होते. तसेच पंचेचाळीस दिवसांनी सुरू झालेली या झेंडूची तोड पुढे दोन ते अडीच महिन्यांपर्यंत सुरू राहते. कलकत्ता झेंडूचे पीक सुमारे ९० ते १२० दिवसांचे आहे. या पिकास २ रुपये ८० पैसेच्या दराने रोपे मिळतात, तर रोप लागवडीसह औषधांचा खर्च एकरी सुमारे साठ हजारांपर्यंत पोहोचतो. मात्र झेंडूस चाळीस ते पन्नास रुपयांचा दर मिळत राहिल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होऊन चांगले उत्पन्न मिळते. मागील काही दिवसांपासून २४ ते २८ रुपयांवर थबकलेला दर मागील आठवड्यात ४०, तर आता ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे झेंडू उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. अशात पुन्हा महिन्याभरावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव लक्षात घेता पुन्हा झेंडूचे दर वधारतील अशी आशा आहे.