शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: June 12, 2016 00:57 IST

टँकरने पुरवठा : आजपासून यंत्रणा सुरळीत; वीज पुरवठा खंडितचा परिणाम

सांगली : नुकत्याच झालेल्या वादळी वारे व मुसळधार पावसामुळे शहरातील झाडे, विद्युत खांब उन्मळून पडले होते. त्यामुळे सांगली शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी सायंकाळी वीज पुरवठा सुरू करून पाणी पुरवठा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. शनिवारी दुसऱ्या दिवशीही अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरात पाणी पुरवठा बंद होता. महापालिकेने टँकरद्वारे काही भागात पाणीपुरवठा केला. गुरूवारी झालेल्या पावसामुळे शहरात ३५ झाडे पडली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलजवळील पाच विद्युत खांब मोडून पडले होते. परिणामी एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गुरूवारी रात्रीपासूनच जॅकवेलचा पाणी उपसा बंद झाला. शुक्रवारी दिवसभर शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव झाली होती. सकाळपासूनच महापालिका व वीज वितरण कंपनीने विद्युत तारांवर पडलेली झाडे बाजूला करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाचच्या दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे वीज कनेक्शन जोडण्यात आले. त्यानंतर पालिकेने पाणी उपसा सुरू केला. पण शुक्रवारी दिवसभर पाण्याची टाकी व जलवाहिन्या रिकाम्या झाल्याने त्या भरण्यात वेळ गेला. त्याचा परिणाम शनिवारी पाणी पुरवठ्यावर झाला. यशवंतनगर, संजयनगर, शंभरफुटी रस्ता, लक्ष्मी देऊळ, अभयनगर, विजयनगर, शामरावनगर, हनुमाननगर, त्रिमूर्ती कॉलनी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. गव्हर्न्मेंट कॉलनी व काही भागात पाणी पुरवठा खंडित होता. पालिकेने चार ते पाच टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला. शनिवारी दिवसभर पाणी उपसा केल्याने रविवारी सांगलीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले. वॉटर एटीएमला गर्दी सांगलीत दोन दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांनी महापालिकेच्या शास्त्री चौकातील वॉटर एटीएमवर पाण्यासाठी गर्दी केली होती. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या या वॉटर एटीएमवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. एक रुपयात दहा लिटर पाणी मिळत असल्याने नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. (प्रतिनिधी)