शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते पॅचवर्कच्या कामात ४० लाखांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या चारही प्रभाग समितीतील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी ६० लाखाचा निधी मंजूर होता. त्यापैकी केवळ पंधरा लाखाचा निधी शिल्लक असून उर्वरित ४० लाखाचे पॅचवर्क झाल्याचा दावा प्रशासनाने मंगळवारी स्थायी समिती सभेत केला. त्यावर नगरसेवकांनी, कोठे पॅचवर्क केले, असा सवाल करीत, पॅचवर्कच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला. या ...

ठळक मुद्देचौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या चारही प्रभाग समितीतील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी ६० लाखाचा निधी मंजूर होता. त्यापैकी केवळ पंधरा लाखाचा निधी शिल्लक असून उर्वरित ४० लाखाचे पॅचवर्क झाल्याचा दावा प्रशासनाने मंगळवारी स्थायी समिती सभेत केला. त्यावर नगरसेवकांनी, कोठे पॅचवर्क केले, असा सवाल करीत, पॅचवर्कच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला. या कामाच्या चौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचे आदेश सभापती संगीता हारगे यांनी दिले. सभापती हारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सव तोंडावर असून शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नाही. पॅचवर्कच्या कामासाठी प्रशासनाने काय केले, असा सवाल नगरसेवकांनी केला. त्यावर बांधकाम विभागाकडून खुलासा करण्यात आला. चार प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी पंधरा लाखाचा निधी पॅचवर्कसाठी दिला होता. त्यात प्रभाग समिती दोन व तीनमधील निधी संपला असून, प्रभाग एकमध्ये अडीच लाख व प्रभाग चारमध्ये साडेबारा लाखाचा निधी शिल्लक असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. प्रशासनाच्या खुलाशानंतर नगरसेवक संतोष पाटील, दिलीप पाटील, प्रदीप पाटील, शिवराज बोळाज यांनी, पॅचवर्क कोठे केले आहे ते दाखवा, असे आव्हान दिले. दरवर्षी प्रत्येक प्रभाग समितीत रस्त्यांच्या पॅचवर्कवरील १५ लाखाचा निधी गायब होतो. यंदा तर प्रशासनाने पॅचवर्कसाठी निधीच दिला नाही. सध्याचा मंजूर निधी हा गतवर्षीचा आहे. प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. पॅचवर्कचा ४० लाखांचा निधी गायब झाला असून, या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. सभापती हारगे यांनी उपायुक्तांना चौकशीचे आदेश देत, पुढील सभेत अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे पुढील सभेत सादर होणाºया अहवालाकडे आता सदस्यांचे लक्ष लागले आहे. हा विषय आता चर्चेचा ठरणार आहे. दोन रस्त्यांवर : ४५0 खड्डेमंगळवार बाजार ते अहिल्यादेवी होळकर चौक व लक्ष्मी देऊळ ते चैत्रबन नाला या दोन रस्त्यांवर ४५० खड्डे पडल्याचे नगरसेवक संतोष पाटील यांनी सभेत सांगितले. ते म्हणाले की, या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना, प्रशासन झोपा काढत आहे. सामाजिक संघटना खड्डे मुजविण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्याचीही दखल घेतली जात नाही. या दोन्ही रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी ना हरकत दाखला दिला आहे. गेल्या वर्षभरात रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. महापालिकेनेही हा रस्ता मंजूर केला आहे. बांधकाम विभाग रस्ता करणार नसेल, तर महापालिकेने तो करावा. सध्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरून त्याची लेव्हल करावी, अशी मागणी केली. त्यावर उपायुक्तांनी, गुरुवारपासून काम सुरू करण्याची ग्वाही दिली. पगारापुरतेच प्रशासन : बोळाजसांगलीतील मारुती रोड, हरभट रस्ता, बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. कोठेही हातगाड्या लागतात. कोठेही व्यवसाय केला जातो. फेरीवाला धोरणाचे नियोजन करण्याची मागणी वारंवार केली, पण प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. अधिकारी महिन्याला पगार घेतात आणि घरी जातात, अशी स्थिती आहे. शहराचे विद्रुपीकरण सुरू असल्याचा आरोप शिवराज बोळाज यांनी केला. याबाबत येत्या चार दिवसात वाहतूक शाखा व महापालिकेची बैठक घेऊन नियोजन करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिले.