शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बहेमध्ये सर्वच गटांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST

शिरटे : साखर कारखानदारीत संचालकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बहे (ता. वाळवा) येथे सहकार पॅनेलकडून इच्छुकांची मांदियाळी आहे. या ...

शिरटे : साखर कारखानदारीत संचालकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बहे (ता. वाळवा) येथे सहकार पॅनेलकडून इच्छुकांची मांदियाळी आहे. या पॅनेलमध्येच तीन-चार गट असून उमेदवारीसाठी सर्वच गटांकडून रस्सीखेच सुरू आहे.

संस्थापक पॅनेलकडून येथून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर ‘रयत’मधील नावांची चर्चा सुरू आहे.

राजारामबापू साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांच्या पत्नी जयश्री ‘कृष्णा’च्या विद्यमान संचालिका आहेत. त्यांनी स्वत: किंवा मुलगा माजी उपसरपंच मनोज पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मदनराव मोहिते यांचे स्नेही व माजी संचालक अजितराव थोरात हेही ‘सहकार’कडून इच्छुक आहेत.

विद्यमान संचालक अमोल गुरव, सोसायटीचे माजी अध्यक्ष विलासराव हंबीरराव पाटील, संगीता सुनील पाटील, माजी सरपंच सर्जेराव दमामे यांच्या पत्नी हेमलता, खरातवाडीचे माजी सरपंच आविनाश खरात व हुबालवाडीचे सीताराम हुबाले या सहा इच्छुकांच्या नावांचा चेंडू राजारामबापू कारखान्याचे विद्यमान संचालक विठ्ठलराव पाटील, शिवाजीराव मुरारजी पाटील, जयदीप पाटील यांनी चेंडू भोसले यांच्या कोर्टात ढकलला आहे.

महिला राखीव असेल तर प्रा. संगीता पाटील व सर्वसाधारण गटातून प्रा. सुनील पाटील या पती-पत्नीसाठी मागणी केल्याचे माजी सरपंच बी. जी. पाटील यांनी सांगितले.

चारही गटांकडून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी गावात ‘कृष्णे’चे दोन उमेदवार होते. त्यामुळे याहीवेळी दोघांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे.

माजी संचालक संभाजी दमामे, पत्नी मीनाक्षीदेवी व बंधू संतोष दमामे यांनी संस्थापक पॅनेलकडून अर्ज दाखल केले आहेत. एच. आर. पाटील रयत पॅनेलकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.