शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात रस्त्यांसाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST

इस्लामपूर : चार वर्षांपासून बहुतांशी नगरसेवक सर्वसाधारण सभा सोडली तर नगरपालिकेकडे फिरकलेसुद्धा नाहीत. काहीजण प्रभागांतील नागरिकांच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे ...

इस्लामपूर : चार वर्षांपासून बहुतांशी नगरसेवक सर्वसाधारण सभा सोडली तर नगरपालिकेकडे फिरकलेसुद्धा नाहीत. काहीजण प्रभागांतील नागरिकांच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. आता वर्षावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक ‘जागरूक’ झाले असून, प्रभागात निधी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

सध्या काही योजनांतून नगरपालिकेकडे निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये काही नगरसेवकांनी स्वबळावर निधी मिळविला आहे. या निधीच्या वाटणीसाठी सभागृहात वाद उफळला होता. सध्या शहरात दलित वस्तीच्या निधीचा वापर करून काही ठिकाणी रस्ते चालू आहेत, तर काही प्रभागांत रस्त्यांचा थांगपत्ता नाही. काही रस्ते नगरोत्थान योजनेतून केले जात आहेत. सत्ताधारी विकास आघाडीच्या नगरसेविका सुप्रिया पाटील, जयश्री पाटील, शकील सय्यद आणि राष्ट्रवादीचे डॉ. संग्राम पाटील यांच्या प्रभागात रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु भुयारी गटारीच्या कामाला अद्यापही मुहूर्त लागला नाही. त्यामुळे उपनगरांतील आणि मुख्य रस्त्यांची कामे होऊ शकलेली नाहीत.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि बांधकामे पाहता काही उपनगरांत अरुंद रस्ते आहेत. गटारीची कामे अपूर्ण आहेत. अशा प्रभागातील नागरिकांनी जलसंपदामंत्री पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. याची दखल पाटील यांनी घेऊन काही निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीवर विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा हक्क आहे, असा दावा केला जात आहे, तर हा निधी प्रत्येक प्रभागाला समान पद्धतीने द्यावा, अशी भूमिका सत्ताधारी विकास आघाडीतील नगरसेवकांची आहे. परंतु काही नगरसेवकांनी दबाब वापरून स्वत:च्या प्रभागातील रस्त्यांची डागडुजी आणि रस्ते करण्यास प्रारंभ केला आहे.

‘लोकमत’चा दणका

शहरातील विविध भागांत रस्त्यांच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला आहे. याची दखल घेऊन सत्ताधारी विकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात रस्त्यांची कामे सुरू केली आहेत.

फोटो- १२०१२०२१-आयएसएलएम- इस्लामपूूूर न्यूज

ओळ : महादेवनगर परिसरातील निर्मला सांस्कृतिक भवनसमोरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

लोगो : नगरपालिका