शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

नियमांना डांबर फासून रस्ते निर्मिती

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

महापालिकेचा कारभार : शहरातील नागरिकांमधून संताप

अविनाश कोळी - सांगली -नियम, तरतुदी, कार्यप्रणालीची मार्गदर्शक तत्त्वे यांनाच डांबर फासून महापालिकेने आजवर रस्ते निर्मिती केल्याचे दिसून येते. त्यामुळेच नागरिकांना चांगल्या रस्त्यांचे सुख आजवर मिळू शकले नाही. अल्पायुषी रस्ते करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होत असल्याने आता लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. शहरातील एकही रस्ता सध्या सुस्थितीत नाही. दर्जा काय असतो, याची कल्पना देण्यासाठीही उदाहरणादाखल रस्ता कुठेही दिसत नाही. रस्ते अल्पायुषीच असतात, हे ठासविण्याचा प्रयत्न जणू महापालिका व ठेकेदार करीत असावेत. महापालिकेच्या स्थापनेला १६ वर्षे झाली, तरीही रस्ते निर्मितीच्या प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही. उलट महापालिका जशी अनुभवी होत आहे, तसतसे रस्त्यांचे आयुष्य कमी होत आहे. रस्त्यांच्या कामाचे गणित याठिकाणी वेगळे आहे. म्हणूनच आजवर रस्ते खराब का होतात, याचे उत्तर महापालिकेला अद्याप देता आलेले नाही.तरतुदींचे पालन कोण करणार?५महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम २१0 (३) नुसार महापालिकांना आराखड्यासह रोड रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. रस्त्यांबाबतच्या घडामोडींची नोंद यामध्ये ठेवायची असून, ते सर्वांसाठी खुले ठेवण्याचीही तरतूद आहे. प्रत्यक्षात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडे असे रोड रजिस्टरच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.महापालिकेच्या अधिनियमातील कलम ६३ (१८) नुसार सार्वजनिक रस्ते, पूल बांधणी, दुरुस्ती आणि सुधारणेची जबाबदारी महापालिकेची आहे. २५ सक्तीच्या सेवांमध्ये रस्ते निर्मितीचाही समावेश आहे. शहर सुधार समितीच्यावतीने शहरातील खड्डेप्रश्नी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेला म्हणणे मांडण्याची सूचना न्यायालयाने केल्यानंतर महापालिका क्षेत्रातील एकाही रस्त्यावर एकही खड्डा नाही, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन आयुक्त संजय देगावकर यांनी दाखल केले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आयआरसी काय सांगतेइंडियन रोड काँग्रेसने दिलेले रस्ते निर्मितीचे दर्जात्मक प्रमाण राष्ट्रीय स्तरावर वापरले जाते. त्यांच्या प्रमाणानुसार पॅचवर्कचे काम करताना खड्डा कोणत्याही आकारात असला तरी, चौकोनात तो खणून त्यामध्ये डांबरीकरणासारखे स्तर करून पॅचवर्क करावे, असे म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून पॅचवर्क केले जाते. त्यामुळे काही दिवसातच त्या मुरुमाची माती होऊन शहरातील धुलिकणांच्या प्रमाणात भर पडते. गतिरोधकांनासुद्धा नियमावली आहे. अशा कोणत्याही नियमांचा, प्रमाणांचा आधार महापालिका घेत नाही. त्यामुळेच रस्ते अल्पायुषी होत आहेत.