शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

जत पूर्वभागातील रस्ते कर्नाटककडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संख : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सीमाभागातून कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कर्नाटक पोलीस, आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सीमाभागातून कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कर्नाटक पोलीस, आरोग्य आणि महसूल यंत्रणा अलर्ट झाली आहे. सीमा बंद करून सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. विजापूरला जाणारे सीमेलगत असणारे सर्व रस्ते बॅरिकेड‌्स लावून बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनाना, लोकांनी प्रतिबंध केले जात आहे.

तालुक्याच्या उत्तरेला सोलापूर जिल्हा हद्द आणि दक्षिणेला बेळगाव जिल्हा हद्द लागते. पूर्वभागाला विजापूर जिल्ह्याची हद्द आहे. पूर्वभागातील ६४ गावांचे व्यवहार विजापूर जिल्ह्याशी निगडित आहेत. विजापूर, इंडी तालुक्याच्या सीमा लागून आहेत. सोनलगी, सुसलाद, अक्कळवाडी, कोणबगी, धुळकरवाडी, मुचंडी, कागनरी, उमदी, सिद्धनाथ, उमराणी, गिरगाव, रावळगुंडवाडी, गुलगुंजनाळ, जालीहाळ खुर्द, कोंतवबोबलाद, माणिकनाळ या गावापासून कर्नाटकाला जोडणाऱ्या सीमा आहेत.

या भागातील बहुतांश नागरिकांचे नातेवाईक सीमाभागात आहेत. आर्थिक व्यवहार, व्यापार, किराणा माल, शेतीविषयक औषधे, साहित्य, अन्य बाबीची खरेदी-विक्रीची कामे कर्नाटकातील विजापूर, अथणी, चडचण या शहराशी निगडित आहेत.

सीमाभागातील कागनरी ते यत्नाळ, ढोकळेवाडी जालगिरीतांडा, धुळकरवाडी ते घोणसगी, जालीहाळ खुर्द ते ऐगनाळ, सिद्धनाथ ते कनमडी, कोंतवबोबलाद ते विजापूर, उमदी ते चडचण, कोंकणगाव, तिकोंडी ते यत्नाळ, मुचंडी ते कनमडी, उमराणी ते ककमरी हे रस्ते बॅरिकेड‌्स लावून बंद केले आहेत.

कर्नाटक पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. सीमेवर पोलिसांचा २४ तास कडा पहारा आहे.

कोट

उमदी पोलिसांनी मंगळवेढा, चडचण, कोंतवबोबलाद सीमेवर बॅरिकेड‌्स लावलेले आहेत. तिकोंडी रस्त्यावर बंदोबस्त ठेवला आहे.

दत्तात्रय कोळेकर,

पोलीस निरीक्षक, उमदी.