शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

क्रांतिकारकांचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट

By admin | Updated: August 7, 2016 01:06 IST

पी. साईनाथ : विटा येथे ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ प्रदान

विटा : थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेने ब्रिटिशांची रेल्वे लुटली नाही, तर ब्रिटिशांनी लुटलेला भारतीयांचा पैसा परत आणून तो स्वातंत्र्यासाठी वापरला. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. आतापर्यंत पुरस्कार अनेक मिळाले, पण क्रांतिकारकांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराची तुलना अन्य पुरस्काराशी होऊ शकत नाही, असे मत शनिवारी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील, कॉ. सुभाष पवार, माधवराव मोहिते उपस्थित होते.पी. साईनाथ म्हणाले की, गेल्या २० वर्षात देशात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संख्या ६३ हजार आहे. औरंगाबाद शहरात सध्या १५० मर्सिडीज, बेन्झ या महागड्या गाड्या आहेत. त्याच भागात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. बॅँका अशा महागड्या गाड्या घेण्यासाठी ७.५० टक्के व्याजदराने कर्ज देते. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याच बॅँका १५ टक्के व्याजदराने कर्ज देत आहेत. ही विषमता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आपला देश महासत्ता कसा बनणार?क्रांतिसिंह नाना पाटील लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी होते. ब्रिटिशांनी लुटून नेलेला पैसा त्यांनी तुफान सेनेच्या सहकार्यातून परत मिळविला व तो स्वातंत्र्यासाठी वापरला. परंतु, आजचे नेते पैशाची लूट करीत असून, ते त्यांच्या खासगी बॅँक खात्यात जमा होत असल्याची टीकाही यावेळी पी. साईनाथ यांनी केली. ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, १६४९ ला इंग्लंडची राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्वात आली. या घटनेची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात त्यावेळी जहागिरी व वतनदारी संपवून अठरापगड जाती एकत्रित करून समतेसाठी लढा दिला. परंतु, आज मूठभर लोकांच्याच घरात लक्ष्मी नांदत आहे. आर्थिक क्षमता सर्वसामान्य लोकांत जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत भारत समृध्द देश होणार नाही.अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास जे. के. (बापू) जाधव, प्रा. पी. ए. शितोळे, इंद्रजित पाटील, नानासाहेब पाटील, उत्तम पवार, शाब्बासराव मुळीक, जयराम मोरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)