शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीच्या नियोजनाचा बोऱ्या

By admin | Updated: December 30, 2014 23:26 IST

अधिकारी ताटकळत : जिल्हाधिकारी कार्यालयातील ऊस दराच्या चर्चेमुळे बैठकच रद्द

सांगली : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच सांगलीत आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात आज (मंगळवारी) गोंधळ दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीच्या नियोजनाचे तीन-तेरा झाले. बैठकीच्या निमित्ताने आलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास ताटकळत उभे रहावे लागले. पालकमंत्र्यांसह आमदार-खासदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करून बैठकीची औपचारिकता पार पाडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. तेथील स्क्रीनवर नियोजन समितीच्या बैठकीसाठी स्वागताचा मजकूरही झळकत होता. शासकीय अधिकाऱ्यांना एक दिवस अगोदरच याबाबतचे निरोप धाडण्यात आले होते. दुपारी एक वाजता बैठकीची वेळ असल्याने साडेबारालाच अधिकाऱ्यांनी सभागृहात गर्दी केली. अधिकाऱ्यांसह ग्रामीण भागातील काही लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनीही गर्दी केली होती. बरोबर दुपारी एक वाजता पालकमंत्री पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र ते आढावा बैठकीऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात गेले. त्यांच्याबरोबर खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनीही जिल्हाधिकारी कक्षात प्रवेश केला. तेथे ऊस दरासह अन्य प्रश्नांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. तब्बल तीन तास उलटले तरी बैठकीसाठी पालकमंत्री येत नसल्याने, ते हैराण झाले. तरीही शिष्टाचारानुसार त्यांनी प्रतीक्षा केली. अन्य सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही पालकमंत्री पाटील यांना निवेदन देण्यासाठी ताटकळत उभे होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकारी कक्षाचा दरवाजा उघडला आणि पालकमंत्री बाहेर पडले. आता आढावा बैठक होईल, असे वाटत असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या लाल दिव्याच्या वाहनात बसून निघून गेले. हा प्रकार पाहून उपस्थित अधिकारी अवाक् झाले. बैठक घ्यायची नव्हती, तर सर्वांना बोलावले कशासाठी, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. (प्रतिनिधी)कार्यालयीन कामकाज ठप्पजिल्ह्यातील बहुतांश अधिकारी या बैठकीसाठी आल्याने शासकीय कार्यालयांतील अनेक कामे ठप्प झाली. दिवसभर अधिकारी या बैठकीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अडकून पडले होते. लाल दिव्याच्या वाहनात मंत्रीमहोदयांच्या शेजारी बसण्याची हौस भाजपमधील काही पदाधिकारी आणि नेत्यांनी भागवून घेतली. त्यांच्या या हौसेमुळे खुद्द पालकमंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडीतही वडाप वाहनात बसल्याचा अनुभव घ्यावा लागला. सांगलीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुधीर गाडगीळ, दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.