शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

दस्तनोंदणीतून जिल्ह्यात २१३ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे दस्त नोंदणी्ला जिल्ह्यात कोरोना काळातही मोठी चालना मिळाली. त्यामुळे यंदा यातून तब्बल ...

सांगली : शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे दस्त नोंदणी्ला जिल्ह्यात कोरोना काळातही मोठी चालना मिळाली. त्यामुळे यंदा यातून तब्बल २१३ कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत व यंदाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत हा महसूल अधिक आहे.

जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व नोंदणी फीच्या माध्यमातून यावेळी ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ५३ हजार ४३२ दस्तांची नाेंदणी झाली. १९० कोटींचे उद्दिष्ट असताना, २१३ कोटी २ हजार ९४६ इतका महसूल मिळाला. शासनाने मुद्रांक शुल्क सवलत दिल्यानंतर बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली. डिसेंबरपर्यंत ३ टक्के व मार्चअखेर २ टक्के शुल्क सवलतीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी भागातूनही मोठी दस्तनाेंदणी झाली. कडेगाव तालुक्यातून सर्वाधिक २१७ टक्के, कवठेमहांकाळमध्ये १०७ टक्के, आटपाडीतून १९६ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली. सांगलीतील सहजिल्हा निबंधक कार्यालयात १६७ टक्के महसूल मिळाला. कोरोना काळातही शासनाच्या शुल्क सवलतीचे सकारात्मक परिणाम बांधकाम व्यवसायावर दिसून आले आहेत. त्यामुळेच शासनाच्या महसुलातही अधिक भर पडली आहे.

जिल्ह्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात १८७ कोटी महसूल गृहीत धरला असताना १९८ कोटी म्हणजेच १०६ टक्के महसूल जमा झाला. संपलेल्या आर्थिक वर्षात त्यापेक्षा ६ टक्क्यांनी अधिकची भर पडली आहे. शुल्क सवलतीचा लाभ घेण्यासाठी मार्चमध्येही मोठी गर्दी सर्व कार्यालयांमध्ये झाली होती. मार्चमध्ये शासनाची सवलत संपुष्टात आली.

तालुकानिहाय स्थिती

कार्यालय दस्तनोंदणी महसूल टक्के

सांगली ९९५१ ५४,२१,९५,२०० ९६.८२

मिरज ६७५२ २३,३२,५९,४२० ८६.३९

कुपवाड ४१६९ २१,००,१२,९७० १७५.०१

वाळवा ४८७१ १३,६८,८५,२९६ १०५.२९

जत ४३९५ १०,६१,६६,९६१ ९८.७६

तासगाव ५०३४ १०,५८,३८,१८० ९८.४५

विटा-खानापूर ३६९७ १०,५३, ४९,३३० ९७.९९

आटपाडी २१२० १४,७५,८६,७५२ १९६.७८

आष्टा २९२१ ७,०१,७०,७४५ १०७.९५

शिराळा १३५४ ३,१०,४९,४२० ८६.२२

पलूस ३४५७ ६,६२,०३,२८५ ८२.७५

कडेगाव १९३९ ९,७९,७४,५०२ २१७.७२

क.महांकाळ २७७२ ८,०९,१३,००० १०७.८८

सांगली १९,६३,९७,८८५ १६७.१४

आष्टा २९२१