शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गरिब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निवृत्तीला ठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आपल्या आवडत्या राजकीय नेत्याला पद मिळावे, आमदारकी मिळावी म्हणून कार्यकर्ते उपासतापास करीत असल्याची अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आपल्या आवडत्या राजकीय नेत्याला पद मिळावे, आमदारकी मिळावी म्हणून कार्यकर्ते उपासतापास करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत; नेत्यांच्या वाढदिवसाला पदरमोड करण्याची संख्याही कमी नाही. मात्र, ही पदरमोड किती सत्कारणी लागते, हा संशोधनाचा विषय आहे. अशातच मिरजेतील महापालिका शिक्षण मंडळाकडील मुख्य लिपिक श्रीकांत भोई यांनी मात्र समाजासमोर नवा आदर्श ठेवत नेत्याच्या वाढदिवसाला गोरगरीब, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा संकल्प केला आहे.

श्रीकांत भोई हे मिरजेतील महापालिका शिक्षण मंडळाकडील मुख्य लिपिक, लेखापाल या पदावर कार्यरत आहेत. ते आज, शुक्रवारी (दि. ३०) सेवानिवृत्त होत आहेत. महापालिकेचे माजी महापौर किशोर जामदार यांना ते मानतात. जामदार यांचा गुरुवारी वाढदिवस होता. नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भोई यांनी आगळावेगळा संकल्प केला.

आपण सेवानिवृत्त होत असून, आपल्या भविष्य निर्वाह निधीतील एक लाख रुपयांची रक्कम बँकेत ठेव स्वरूपात ठेवावी. या रकमेतून किशोर जामदार यांच्या वाढदिवशी मिरज हायस्कूल व महापालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. त्यासाठी ‘किशोर जामदार एज्युकेशन फंड शिष्यवृत्ती’ या नावाने हा उपक्रम सुरू करावा, असे पत्रच त्यांनी महापालिकेच्या प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांना दिले. त्यांच्या या संकल्पाचे मिरजेत कौतुक होत आहे. वास्तविक, आपला नेता आमदार व्हावा, खासदार, मंत्री व्हावा म्हणून अनेक कार्यकर्ते संकल्प करीत असतात; पण लिपिक असलेल्या भोई यांनी नेत्यांच्या वाढदिवसाच्या संकल्पातही सामाजिक जाणीव ठेवल्याचे दिसून येते. भोई यांच्या वाढदिवस भेटीने किशोर जामदारसुद्धा भारावून गेले होते.

चौकट

फंड वाढविण्याचा निर्धार

श्रीकांत भोई यांच्या संकल्पाची मिरजेत दिवसभर चर्चा सुरू होती. त्यात आता जामदार यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हा फंड पाच लाखांपर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे. या रकमेच्या व्याजातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे.