शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणूक काळातील स्वागत कमानींवर निर्बंध

By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST

मिरजेत सतर्कता : नेत्यांच्या जाहिराती आचारसंहितेच्या कात्रीत

मिरज : गणेशोत्सवादरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने मिरजेत पोलिसांनी स्वागत कमानींवर निर्बंध लागू केले आहेत. कोणत्याही राजकीय नेत्यांची छबी कमानीवर झळकविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव आल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. मिरजेच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या स्वागत कमानीवरही इच्छुक उमेदवार दिसण्याची शक्यता होती. यासाठी उमेदवारांना कॅश करण्यासाठी कमानीचे संयोजक सरसावले आहेत. मात्र गणेशोत्सवादरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असल्याने उमेदवार धास्तावले आहेत. पोलिसांनी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून कमानीवर नेत्यांच्या जाहिरातींना लगाम लावण्याची तयारी केली आहे. मिरजेत गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर सात ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येतात. यावर्षी कमानीवर पक्ष किंवा नेत्यांची जाहिरात करावयाची असल्यास पोलीस व महापालिकेसोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कमान करणारे चित्रकार व फ्लेक्सचे मुद्रण करणाऱ्यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. कमानीवरील जाहिराती व छायाचित्रे पोलिसांना अगोदर दाखवावी लागणार आहेत. विनापरवाना जाहिराती करणाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचे खटले दाखल करू, असे पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी सांगितले. (वार्ताहर)स्वागत कक्षावरही येणार संक्रांतराजकीय पक्षांच्या स्वागत कक्षावरही संक्रांत येणार आहे. शिवसेना, जनसुराज्य शक्ती, मनसे, रिपाइं या राजकीय पक्षांतर्फे मिरवणूक मार्गावर स्वागत कक्ष उभाण्यात येतात. त्यांच्या स्वागत कक्षासाठीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यावर्षी कोणत्याही नवीन स्वागत कक्षाला परवानगी देण्यात येणार नाही, मात्र पोलीस दलातर्फे स्वागत कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. ४आचारसंहितेचे निर्बंध लागू झाल्यास राजकीय नेत्यांच्या जाहिरातीना मुकावे लागणार आहे. त्यातून तोडगा म्हणून इच्छुकांच्या संस्थेच्या जाहिराती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.