शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मालगावात ग्रामविकास अधिकारी बदलण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

मालगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अनिता क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत ...

मालगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अनिता क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत पाणीपुरवठा निधीच्या खर्चाबाबत तुषार खांडेकर व प्रदीप सावंत यांनी ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांना जाब विचारला. कोरे यांच्याकडून समाधकारक उत्तर न मिळाल्याने खांडेकर व सावंत यांनी खर्चावर संशय व्यक्त केला. ग्रामस्थांतूनही ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. कोरे यांच्या बदलीचा ठराव विश्वास खांडेकर व स्वप्निल खांडेकर यांनी मांडला. त्यास मंजुरी मिळाली.

सुभाषनगर येथील मुनाप मालगावे सभेत प्रश्न विचारत असताना सरपंचांऐवजी त्यांचे पती उत्तरे देण्याचा प्रयत्न करू लागले. यातून मालगावे व सरपंचांच्या पतीत वाद झाला. यापुढे ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंचांच्या पतीचा हस्तक्षेप झाल्यास याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेस प्रदिप सावंत, शशिकांत कनवाडे, अजित भंडे, कपिल कबाडगे, राजू भानुसे, संजय खोलकुंबे, पोलिसपाटील अश्विनी कबाडगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

सहीसाठी पैसे

ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांनी रोजगार हमीच्या जॉबकार्डवर सहीसाठी पैसे मागितल्याचा दिनेश कोकणे यांनी आरोप केला. यामुळे सभेत कोरे यांच्या अडचणीत भर पडली. कोरे यांनी यावर बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला.