शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण उद्योग वाढीसाठी अहवाल

By admin | Updated: July 27, 2014 23:58 IST

सुरेश पाटील : प्रत्येक जिल्ह्याला तीन कोटींची मागणी

सांगली : ग्रामीण उद्योग वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला असून, या सूचनांची अंमलबजावणी केल्यास वर्षाला सुमारे अडीच हजार उद्योजक तयार होतील, अशी माहिती राज्याचे खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात खादी ग्रामोद्योग महामंडळाने २३ जिल्ह्यांचा दौरा करुन बारा बलुतेदारांची, बचत गटांचे मेळावे घेतले. त्यानंतर राज्यात खादी ग्रामोद्योग वाढीसाठी काय उपाय योजना करता येतील, याचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. रोजगार वाढविण्यासाठी आपण बिनव्याजी परतफेड योजना, ग्रामीण कारागीर विकास योजना, सहकारी संस्थांचा विकास आदी विषयी उपाय सूचवले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला ३ ते ५ कोटींचा निधी दिल्यास प्रत्येक उद्योजकाला ५ ते ४० लाखांपर्यंतचे पाच वर्षासाठी कर्ज दिल्यास वर्षाला सुमारे अडीच हजार उद्योजक निर्माण होणार आहेत. बारा बलुतेदारांचा उद्योग करणाऱ्यांना पाच लाखांचे भांडवल दिल्यास पारंपरिक उद्योग टिकणार आहेत. त्यांना व्याजाचे अनुदान देण्याची मागणी आपण केली आहे. राज्य शासनाने ३३३ सोसायट्यांसाठी दिलेल्या ९८ कोटी ५९ लाखांचे कर्ज माफीची मागणी आपण केली आहे. कुंभार समाजासाठी माती बोर्ड स्थापन करुन त्यांना उद्योग पुरवणे यासाठी अभ्यास समिती आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. उद्योग वाढीसाठी लक्ष देणे गरजेचे असून, शासकीय दिरंगाईचा फटका सामान्यांना बसत आहे. आघाडी सरकारकडे असलेल्या कालावधित आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी आमची मागणी आहे. यावेळी आर. पी. बुचडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)