शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कामाचे पैसे पुन्हा हडपण्याचा डाव

By admin | Updated: June 16, 2016 00:57 IST

जिल्हा परिषद : सहा कामे परत दुरुस्तीसाठी; वाटपाला अखेर स्थगिती

सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध इमारतींची दुरुस्ती झाली असताना पुन्हा त्यांचा काम वाटपाच्या यादीत समावेश करून पैसे हडपण्याचा डाव बुधवारी उधळून लावण्यात आला. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव योगेंद्र थोरात यांनी कामवाटप थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर सोसायट्यांना वाटप करण्यात येणाऱ्या कामांना स्थगिती देऊन चौकशीचे आश्वासन दिले.जिल्हा परिषदेतील मुख्य प्रशासकीय इमारतीतील पहिल्या मजल्यावरील अध्यक्षांच्या दालनाजवळील स्वच्छतागृहांची दुरुस्ती, उपाध्यक्ष, सभापती निवासस्थाने अशा सहा कामांची दुरुस्ती यापूर्वीच झाली आहे. स्वीय निधीतील चार कोटी ४९ लाख रूपयांची २१८ कामे सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर सोसायट्यांना वाटपासाठी बुधवारी जिल्हा परिषदेत बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये नवी यादी पुढे आली. मात्र यादीतील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आठ कामांपैकी सहा कामे महिन्याभरापूर्वीच झाली असल्याचे योगेंद्र थोरात यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारीऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करून, काम वाटप समितीची बैठक रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, चौकशी करून अहवाल देण्याची सूचना केली. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे थोरात यांनी सांगितले. दरम्यान, दिलीप पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली असता, झालेल्या कामांचा पुन्हा काम वाटपात समावेश झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सर्वच कामांच्या वाटपाला स्थगिती दिली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई कराझालेली कामे पुन्हा काम वाटपात दाखवून बारा लाख हडपण्याचा अधिकाऱ्यांचा डाव होता. जिल्ह्यातील अन्य कामांबाबतही असे झाले असण्याची शक्यता आहे. माधवनगर, बुधगाव येथीलही कामे पूर्वी झाली असून तेथील कामांचा पुन्हा यादीत समावेश केला आहे. उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता कामावर भेट देऊन कामाचे अंदाजपत्रक तयार करीत नाहीत. सर्व कामांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी योगेंद्र थोरात यांनी केली.