शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘वालचंद’च्या ताब्यावरून पुन्हा वाद

By admin | Updated: May 25, 2016 23:39 IST

गुंडगिरीचा आरोप : संचालकाला दमदाटी करून हटविले, एमटीईने आरोप फेटाळले

सांगली : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून वालचंद अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटी यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. मंगळवारी दुपारी एमटीईच्या गुंडांनी महाविद्यालयात प्रवेश करून संचालक डॉ. जी. व्ही. परीशवाड यांना दमदाटी करून हाकलून लावल्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचे व्यवस्थापन कौन्सिलचे रवी पुरोहित यांनी सांगितले. एमटीईचे सचिव प्रा. श्रीराम कानिटकर यांनी हे सर्व आरोप फेटाळत, व्यवस्थापन कौन्सिल स्टंटबाजी करीत असून, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा बुधवारी केला. येथील प्रसिद्ध वालचंद महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून वालचंद अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांच्यात वाद सुरू आहे. सध्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन समितीकडे (अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल) आहे. मंगळवारी दुपारी एमटीईचे सचिव श्रीराम कानिटकर व शंभरहून अधिक जणांनी महाविद्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचार्य व संचालक जी. व्ही. परीशवाड यांना दमदाटी करून त्यांना बेकायदेशीररित्या पदावरून हटविल्याचा आरोप व्यवस्थापन समितीचे सदस्य रवी पुरोहित यांनी केला. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमटीईचे अध्यक्ष तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गुंडांनी मंगळवारी प्रा. कानिटकर यांच्यासह महाविद्यालयाच्या आवारात शिरकाव केला. त्यांनी प्राचार्य व संचालक परीशवाड यांच्या कार्यालयात घुसून त्यांना पदभार सोडण्यासाठी दमदाटी केली. त्यांना कार्यालयाबाहेर काढून त्यांच्याकडील चाव्या ताब्यात घेतल्या. परीशवाड यांच्याजागी एम. जी. देवमाने यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे पदभार सोपविला. महाविद्यालयाच्या आवारात शंभरहून अधिक गुंड फिरत असून ते दहशत माजवत आहेत. त्याचा परिणाम पाच हजार विद्यार्थ्यांवर होत असून, विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक दहशतीखाली आहेत. याबाबत एमटीईचे सचिव प्रा. कानिटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पुरोहित यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, वालचंद महाविद्यालयाच्या तत्कालीन संचालक मंडळाने गेली चार वर्षे सोसायटीकडे वार्षिक ताळेबंद व आर्थिक अहवाल सादर केलेला नाही. महाविद्यालयाला स्वतंत्र अस्तित्व नसताना महाविद्यालयाच्या नावे वेगळे पॅनकार्ड काढून त्याचा गैरवापर केला. याप्रकरणी डॉ. परीशवाड यांना निलंबित करून चौकशी करण्याचा निर्णय सोसायटीच्या बैठकीत झाला. त्यानुसार डॉ. परीशवाड यांच्याजागी संचालक म्हणून एम. जी. देवमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र देण्यासाठी परीशवाड यांच्याकडे देवमाने गेले होते. कोठेही दमदाटी, गुंडगिरीचा प्रकार घडलेला नाही. वालचंद व्यवस्थापन समितीकडून याबाबत स्टंटबाजी केली जात आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : पुरोहितभाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख व त्यांच्या समर्थकांनी वालचंद महाविद्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेतला आहे. डॉ. परीशवाड यांना दमदाटी केल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. लवकरच आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सदस्य रवी पुरोहित यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनीही व्यवस्थापन समितीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे पुरोहित म्हणाले.