शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव जॅकवेल आणि आळसंद जलशुद्धिकरण केंद्राचा वीज पुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : विटा शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव जॅकवेल आणि आळसंद जलशुद्धिकरण केंद्राचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणने या योजनेसाठी स्वतंत्ररीत्या वीज पुरवठा अखंडित करावा, अशी मागणी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी केली आहे. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे.

विटा शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी पलूस तालुक्यातील घोगाव येथील कृष्णा नदीपात्रात जॅकवेल तयार आहे. तेथून विद्युत पंपाद्वारे पाणी उचलून आळसंद येथील जलशुद्धिकरण केंद्रात टाकले जाते. तेथून पुन्हा विद्युत पंपाद्वारे पाणी शहरात पोहोचत आहे.

परंतु, गेल्या काही महिन्यांपासून घोगाव जॅकवेल व आळसंद जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यास नगरपालिकेला मोठी अडचण निर्माण झाली आहे. महावितरणने विटा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र विद्युत प्रवाह जोडून देऊन अखंडित वीज द्यावी, अशी मागणी महावितरणकडे केली. या मागणीचे पत्र माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, अ‍ॅड. धर्मेश पाटील व विनोद पाटील यांनी सांगलीचे महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना दिले.

यावेळी पेठकर यांनी याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करून अखंडित वीज पुरवठ्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करू, अशी ग्वाही दिली.