शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन

By admin | Updated: September 20, 2016 00:04 IST

गौरव नायकवडी : जागा देण्याबाबत प्रशासनाला सूचना

वाळवा : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाचा व जमिनी प्राप्त होण्याचा लढा ३२ वर्षे सुरू आहे. याबाबत अंमलबजावणी व्हावी, यासाठी महसूल व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुंबई येथे शनिवारी बैठक झाली. यावेळी वाळव्याचे सरपंच व वारणा धरणग्रस्त संग्राम संघटनेचे प्रमुख गौरव नायकवडी, खा. राजू शेट्टी, नजीर वलांडकर, भारत पाटील, मुसा मुल्ला, श्रीपती पाटील, संपत बेलवलकर प्रमुख उपस्थित होते.पाटील यांना धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाबाबतच्या ३२ वर्षांच्या लढ्याची माहिती गौरव नायकवडी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, धरणग्रस्तांनी अनेकवेळा मोर्चे काढले, कुटुंबियांसमवेत तुरुंगवास भोगला. आज अनेक धरणग्रस्त कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर आंदोलनाचे खटले सुरू आहेत. त्यामुळे त्यांना न्यायाबाबत हेलपाटे मारावे लागत आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वेचले; परंतु जिल्हाधिकारी, आयुक्त तसेच मंत्रालयापर्यंत घेतलेल्या बैठकीत निर्णय होऊनसुद्धा शासन पातळीवरील उदासीनता आहे.ज्यांना भूखंड मिळालेले नाहीत, त्यांची यादी तयार करणे व ज्यांना जमिनी मिळालेल्या नाहीत,अशांना एक महिन्याच्या आत पूर्तता करावी अशा सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (वार्ताहर)जमिनी तात्काळ देणारसांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारी जमीन संपादनासाठी सांगली जिल्ह्यामध्ये २०२ हेक्टर जमिनीसाठी प्रस्ताव चालू आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले.