शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र माने खुनातील तिघांना अटक

By admin | Updated: May 3, 2017 00:04 IST

रवींद्र माने खुनातील तिघांना अटक

सांगली : येथील अहिल्यानगरमधील तडीपार गुंड रवींद्र माने याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित बाबू शिंदेसह तीन संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. रवींद्र शहरात आल्याची बाबूने पोलिसांना ‘टीप’ दिली होती. यातून या दोघांत वाद होऊन त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे रवींद्रची ‘गेम’ केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी रवींद्रचा मित्र इमाम मेहबूब शेख (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्यांमध्ये बाबू ऊर्फ मल्हारी बबन शिंदे (वय २३, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर), ऋषिकेश दिनकर गळवे (१९, वाल्मिकी आवास) व नागेश सुधीर हडदरे (२२, संभाजीनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने ५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. खून झाल्यापासून ते फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सहा महिन्यांपूर्वी रवींद्रला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. २८ मार्चला तडीपार आदेशचा भंग करुन रवींद्र सांगलीत आला होता. त्याला गुंडाविरोधी पथकाने पकडले होते. पथकाला मी आल्याची ‘टीप’ बाबू शिंदे याने दिल्याचा संशय रवींद्रला आला होता. याचा त्याने बाबूला जाबही विचारला होता. यातून दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. गेली एक महिना त्यांच्यात धुसफूस सुरु होती. गेल्या आठवड्यात बाबूने रवींद्रच्या गटातील एका तरुणास बोलावून घेतले. त्याला कवलापूर (ता. मिरज) येथील माळावर नेऊन बेदम मारहाण केली होती. ही बाब बाबूला समजताच घटनेपूर्वी एक दिवस अगोदर रवींद्र बाबूच्या घरी गेला होता. त्याने बाबूला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे दोघांतील वैरत्व वाढले. बाबूनेही रवींद्रला सोडायचे नाही, अशी शपथच घेतली. त्याने हत्यारांची जुळवा-जुळव करुन दुसऱ्या दिवसापासून त्याने रवींद्रवर पाळत ठेवली. घटनेदिवशी रवींद्र भावाच्या वाढदिवसासाठी कलानगर येथे मंडप ठरवून तो तीन मित्रांसोबत निघाला असता बाबूने त्याची ‘गेम’ केली होती. (प्रतिनिधी)माफी मागायला लावून केला हल्लारवींद्र भावाच्या वाढदिवसासाठी मंडप ठरवून तो घेऊन जात असताना बाबू व त्याच्या साथीदारांनी त्याला कलानगरमधील दत्त मंदिराजवळ गाठले. रवींद्रच्या दुचाकीला मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रवींद्र व त्याचा मित्र भोराप्पा आमटे उडून पडताच बाबू व साथीदार हत्यारे घेऊन उतरले. त्यांनी रवींद्रला ‘टार्गेट’ केले. बाबूने गेली एक महिनाभर सुरु असलेला वाद उकरुन काढून रवींद्रला पाय धरुन माफी मागायला सांगितले. रवींद्रनेही घाबरुन खाली वाकून गुडगे जमिनीववर टेकून बाबूच्या डोक्यावर पाय ठेवून माफी मागत होता. तेवढ्यात बाबू व साथीदारांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने घाव घातले. रवींद्रला त्यांनी बचावाची संधी दिली नाही, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांना रवींद्रचा गुडघे टेकलेल्या स्थितीतच मृतदेच आढळून आला होता.