शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तासगावच्या नगराध्यक्षपदी राजू म्हेत्र

By admin | Updated: September 18, 2016 00:03 IST

बिनविरोध निवड : अनिल कुत्तेंची उपनगराध्यक्षपदावर बोळवणे

तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर भाजपचे राजू म्हेत्रे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर नगराध्यक्षपद डावलल्याने नाराज झालेल्या अनिल कुत्ते यांची उपनगराध्यक्ष पदावर बोळवण करण्यात आली. जतचे प्रांताधिकारी अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार सुधाकर भोसले, मुख्याधिकारी अभिजित वायकोस उपस्थित होते.तासगावात नगराध्यक्षपदावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत पंधरा दिवसांपासून मोठे नाट्य रंगले होते. या नाट्यावर राजू म्हेत्रे आणि अनिल कुत्ते यांच्या निवडीने तुर्तास पडदा पडला. नगराध्यक्षपदावर राजू म्हेत्रे यांना संधी दिल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले होते, तर ऐनवेळी राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेले अर्ज माघार काढून घेतला होता. बऱ्याचशा घडामोडीनंतर शनिवारी म्हेत्रे यांची भाजपचे चौथे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. तर नगराध्यक्षपद डावलल्याने नाराज झालेल्या कुत्ते यांची उपनगराध्यक्षपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निवडीवेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश थोरात, अजय पाटील, अनुराधा पाटील, आयेशा नदाफ, काँग्रेसचे अजय पवार गैरहजर होते, तर निवडीवेळी भाजपच्या काही नगरसेवकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती.नगराध्यक्ष निवडीनंतर राजू म्हेत्रे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत जल्लोष साजरा केला. म्हेत्रेंच्या निवडीनंतर शहर डिजिटलमय झाले होते; मात्र नगराध्यक्ष निवडीने नाराज असलेल्या कुत्तेंच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडूनदेखील कुत्ते समर्थकांनी जल्लोष साजरा केला नाही. किंबहुना कुत्ते समर्थक कार्यक़र्त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचीच छटा दिसून येत होती. (वार्ताहर)बाबासाहेब पाटील-माणिक जाधव यांच्यात बाचाबाचीनगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेला सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष राजू म्हेत्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी सभागृहात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष माणिकराव जाधव हे नागरिकांना ‘सभागृहात गर्दी करु नका, बाहेर जा’, असे म्हणत होते. यावेळी नगरसेवक बाबासाहेब पाटील यांनी जाधव यांना उद्देशून ‘सर्वांनीच बाहेर व्हा’, असे म्हटले. त्यानंतर नगरसेवक पाटील आणि शहराध्यक्ष जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. भाजपच्या या दोन पदाधिकाऱ्यांतील बाचाबाचीची पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू होती.