शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजारामबापू साखर कारखान्याने (साखराळे, ता. वाळवा) ऑक्सिजन ...

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजारामबापू साखर कारखान्याने (साखराळे, ता. वाळवा) ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याची तयारी ठेवली आहे. सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली आहे. तसेच जिल्ह्यातील विश्वासराव नाईक, सोनहिरा आणि क्रांती कारखान्यानेही ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करूनच शरद पवारांनी राज्यातील कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चोराखळी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील धाराशिव कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प उभारण्याच्या कामास गती दिली आहे. धाराशिव कारखान्यानंतर जिल्ह्यातील राजारामबापू पाटील कारखान्याने साखराळे येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले आहे.

सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी खर्च किती येईल, प्रतिदिन किती ऑक्सिजन तयार करावा, यासह कोरोनाची लाट संपल्यानंतर या ऑक्सिजनचा उद्योगाला पुरवठा करता येईल का, या सर्व मुद्द्यांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. तांत्रिक सल्लाही खासगी कंपनीकडून घेण्यात येणार आहे. त्यानंतर तीन दिवसात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी माहुली यांनी दिली.

सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव), क्रांती (कुंडल, ता. पलूस), विश्वासराव नाईक (चिखली, ता. शिराळा) कारखान्यांनीही ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

चौकट

कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘माॅलेक्युलर सिव्ह' वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती करता येऊ शकते. प्रत्येक साखर कारखाना प्रतिदिन १६ ते २० टन ऑक्सिजन निर्मिती करू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

चौकट

ऑक्सिजन प्लँट उभारणीबाबत विचार : मानसिंगराव नाईक

ऑक्सिजन प्रकल्पासाठी खर्च किती येईल, कोटीत खर्च असेल तर शासन काय मदत करेल का, या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करत आहे. येत्या चार दिवसात ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी दिली.