शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

राजारामबापूंचे छायाचित्र पुन्हा बाजार समितीत!

By admin | Updated: December 23, 2016 23:44 IST

सत्ताधारी वरमले : घोरपडेसमर्थक संचालक आक्रमक

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी गटात बेबनाव अजूनही कायम आहे. बाजार समितीच्या दर्शनी भागातील तैलचित्रांमधील लोकनेते राजारामबापू पाटील यांचे छायाचित्र काढून, त्या जागेवर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे छायाचित्र लावून सत्ताधाऱ्यांनी कुरघोडी केली होती. यावर घोरपडे समर्थक संचालकांनी आक्रमक भूमिका घेताच सत्ताधारी वरमले. त्यांनी वसंतदादा, पतंगराव कदम यांच्यासह राजारामबापूंच्या चित्राचा पुन्हा समावेश केला आहे.बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या दर्शनी भागात वसंतदादा पाटील यांच्यासह लोकनेते राजारामबापू पाटील यांचे छायाचित्र असलेले तैलचित्र लावण्यात आले होते. २००८ मध्ये माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळविल्यानंतर वसंतदादांबरोबर राजारामबापूंच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला होता. गेल्या महिन्यात झालेल्या पदाधिकारी निवडीत सत्ताधारी गटातीलच अजितराव घोरपडे, विशाल पाटील गटाला पूर्णपणे वगळून कदम गटाने बाजी मारली होती. त्यांना मदन पाटील गटाने पूर्ण साथ दिली होती.गेल्या आठवड्यात बाजार समितीतील दर्शनी भागातील तैलचित्रातील राजारामबापूंचे छायाचित्र काढून त्याऐवजी पतंगराव कदम यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. सभापती दालनातील तैलचित्रातही कदम यांचा समावेश करण्यात आला होता. याबाबत संचालक मंडळात जोरदार चर्चा असतानाच, बुधवारी बैठकीच्या निमित्ताने समितीत आलेल्या घोरपडे समर्थक संचालक दीपक शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी, पतंगराव कदम यांच्या छायाचित्राला विरोध नाही, मात्र राजारामबापूंचे छायाचित्र हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर तातडीने वसंतदादा, कदम यांच्याबरोबरच राजारामबापूंचे छायाचित्र पुन्हा लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जयंत पाटील गटाच्या संचालकांचे दुर्लक्षबाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पॅनेलमधून वसंतराव गायकवाड व दिनकर पाटील हे मदन पाटील समर्थक संचालक निवडून आले आहेत. त्यांनी बाजार समितीतील राजारामबापूंचे छायाचित्र हलविण्यात आल्यावरून आवाज उठविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संचालक दीपक शिंदे यांनी केला. जिल्ह्याला विकासाची दिशा देणाऱ्या वसंतदादा, राजारामबापूंसारख्या नेत्यांच्या छायाचित्राला कोणाचा विरोध असू नये. माजी मंत्री पतंगराव कदम आमच्या गटाचे नेते असल्याने त्यांच्या छायाचित्राला विरोध नाही. मात्र, राजारामबापूंचे छायाचित्र काढू देणार नाही, अशी भूमिका शिंदे यांनी व्यक्त केली.