शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:25 IST

ओळ : सांगलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीबाबत मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील व कार्यकर्त्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी ...

ओळ : सांगलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीबाबत मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील व कार्यकर्त्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांना निवेदन दिले.

सांगली : सांगली शहरात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी मावळा प्रतिष्ठान व रॉयल्स युथ फौंडेशनच्यावतीने करण्यात आली. याबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सभागृह नेते विनायक सिंहासने यांना निवेदन देण्यात आले.

उद्योजक समीरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मावळा प्रतिष्ठान व रॉयल्स युथ फौंडेशन कार्यरत आहे. या संघटनांच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. संघटनेच्यावतीने आता छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी कर्मवीर चौक (पुष्पराज चौक) येथे उर्दू हायस्कूलच्या बाजूस मोकळ्या असणाऱ्या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, तसेच यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. सभापती कोरे यांनी याला अनुकूलता दर्शवली असून, संभाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले; तर महापौर सूर्यवंशी यांनी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची अन्यही काही नागरिक, संघटनांनी मागणी केल्याचे सांगून, याबाबत सर्वांची एकत्रित बैठक घेऊन पुतळ्याचे ठिकाण निश्‍चित करण्यात येईल. तसेच संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी राजकारण व पक्षीय भेद बाजूला ठेवून प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी व विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांनी दिली.