शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीवर क्रीडा स्पर्धांची बरसात

By admin | Updated: July 23, 2014 22:59 IST

जिल्ह्यात स्पोर्टस् फिव्हर : दोन राज्य, तेरा विभागीय स्पर्धांचे यजमानपद

आदित्यराज घोरपडे - हरिपूरक्रीडा पंढरी सांगलीवर यंदाच्या वर्षी क्रीडा स्पर्धांची बरसात झाली आहे. दोन राज्य, तेरा विभागीय, चार महिला व दोन ग्रामीण क्रीडा स्पर्धा सांगलीत होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्पोर्टस् फिव्हर आहे. क्रीडाधिकारी कार्यालयाची यंत्रणा कामाला लागली आहे. १४, १७ व १९ वर्षांखालील शालेय राज्य कबड्डी व जिम्नॅस्टिक या दोन राज्यस्तरीय स्पर्धांचा बहुमानही सांगलीला मिळाला आहे. राज्य कबड्डी स्पर्धा आष्ट्यामध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिम्नॅस्टिक स्पर्धेच्या ठिकाणाचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. शांतिनिकेतन की जिल्हा क्रीडा संकुल यापैकी एकाही ठिकाणावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही. जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील, सचिव दीपक सावंत व जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्यात ठिकाण निश्चितीबाबत खलबते सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिम्नॅस्टिकचे अद्ययावत केंद्र असलेल्या शांतिनिकेतनचे नाव आघाडीवर आहे. तेरा विभागीय शालेय स्पर्धा जिल्ह्याच्या मातीत होतील. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे सहभागी होणार आहेत. कबड्डी व जिम्नॅस्टिक या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील खेळाडू सहभागी होतील. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले खेळाडू, प्रशिक्षक व पंचाची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी क्रीडाधिकारी कार्यालयाची सूत्रे वेगाने हलत आहेत. एस. जी. भास्करे, सुनील कोळी, सुधाकर जमादार, उमेश बडवे, प्रशांत मंडले, महेश पाटील, मधुरा सिंहासने ही क्रीडाधिकाऱ्यांची ‘टीम’ धावपळ करीत आहे.सांगलीत शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा घेण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यापूर्वी एकदा मिरजेतील भानू तालमीस राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा घेण्याचा मान मिळाला होता. मल्लखांब असोसिएशनचे सचिव बापू समलेवाले, राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक सावंत व संघटक डॉ. सुहास व्हटकर यांच्या समितीने क्रीडाधिकाऱ्यांची भेट घेतली असून, पुण्यापर्यंत धडक मारली आहे. -राज्य स्पर्धा : कबड्डी, जिम्नॅस्टिक-विभागीय स्पर्धा : व्हॉलिबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, कबड्डी, मल्लखांब, थांगता, वुशू, स्क्वॉश, वुडबॉल, सिलंबम, पिकलबॉल-महिला विभागीय स्पर्धा : खो-खो, कबड्डी, जिम्नॅस्टिक, व्हॉलिबॉल-ग्रामीण विभागीय स्पर्धा : कबड्डी, व्हॉलिबॉल