शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडूनही नुकसान नाहीच?

By admin | Updated: January 2, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांमधून आश्चर्य : कृषी विभागाचा अवाक करणारा अहवाल शासनाला सादर

रत्नागिरी : आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय पेरणी केलेले कुळीथ, पावट्याचे बीज वाया गेले, असे असतानासुध्दा कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल मात्र ‘निरंक’ पाठविण्यात आला असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अवेळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे तीन महिने संपले तरीही पावसाळा काही संपलेला नाही, अशा प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. कोणत्याही क्षणी मळभी वातावरण होते आणि थोड्याच वेळात पाऊस सुरू होतो, असे घडत असल्याने शेतकरी आणि बागायतदार चिंतेत सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आता याच वातावरणाचा परिणाम हापूसवरही होण्याची शक्यता आहे.यावर्षी पावसाळा लांबला. ऐन दिवाळीतही सलग तीन ते चार दिवस पाऊस कोसळत होता. परिणामी कापलेल्या शेताचे नुकसान झालेच शिवाय कापणीसाठी तयार शेतीही भिजली. पेरणी केलेला कुळीथ, पावटा व अन्य भाजीपाला पिकाच्या बिजाचेही नुकसान झाले.काही शेतकऱ्यांची मळणीही भिजली. सतत तीन ते चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे भिजलेल्या भाताला कोंब आले. असे असतानासुध्दा तालुका कृषी कार्यालयांनी नुकसान निरंक असल्याचा अहवाल पाठवला. जिल्हा कृषी कार्यालयानेही तोच अहवाल शासनाकडे सरकविला. त्यामुळे नुकसान असतानासुध्दा शासनाला न कळविल्याबद्दल कृषी विभागाच्या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.गेले दोन दिवसही हवामानात प्रामुख्याने बदल जाणवू लागला आहे. पाऊस पडत असल्यामुळे कलमाच्या मोहोराचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसामुळे मोहोर कुजण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारा व वाऱ्यासह मोहोरही पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाकडून याची दखल घेऊन नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येईल का ? की पुन्हा निरंक अहवाल पाठविला जाईल?वास्तविक ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कृषिसेवकांनी नुकसानाची दखल घेत शासनाकडे तसा अहवाल देणे गरजेचे आहे. परंतु तसे घडत नसल्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने कृषी खात्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)गेल्या काही महिन्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यावर पावसाने वक्रदृष्टी दाखवली आहे. कोणत्याही क्षणी पाऊस येत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.