शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या सभेत राडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 16:18 IST

सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी महापौर व उपमहापौर गटात राडा झाला. सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने सभेत रणकंदन माजले. या गोंधळातच महापौरांनी उपमहापौर विजय घाडगे व शेखर माने या दोघांना निलंबित केले. अखेर माने यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवून नेला. अखेर महापौरांनी ही सभा रद्द करत माने व घाडगे या दोघांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देउपमहापौर गटाने राजदंड पळवला सभा रद्द करत माने व घाडगे या दोघांवर फौजदारी दाखल करण्याचे महापौरांचे आदेश महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे आयोजन दोन्ही बाजूने सभागृहात प्रचंड गदारोळाला सुरुवात सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने रणकंदन

सांगली, 27 : सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी महापौर व उपमहापौर गटात राडा झाला. सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने सभेत रणकंदन माजले. या गोंधळातच महापौरांनी उपमहापौर विजय घाडगे व शेखर माने या दोघांना निलंबित केले. अखेर माने यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवून नेला. अखेर महापौरांनी ही सभा रद्द करत माने व घाडगे या दोघांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीला काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी माळ बंगल्याच्या वादग्रस्त जागा खरेदीचा अहवाल महासभेसमोर सादर करा अशी मागणी केली. याला आक्षेप घेत उपमहापौर गटाचे नेते शेखर माने व उपमहापौर विजय घाडगे यांनी सभा कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे जाहीर करा, अशी आक्रमक भूमिका घेत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली.

सत्ताधारी गटानेही महापौरांच्या आसनासमोर जमा होत अहवालाचे वाचन करा अशी मागणी केली. यावरून दोन्ही बाजूने सभागृहात प्रचंड गदारोळाला सुरुवात झाली. एकमेकांचे उणेदुणे काढत दोन्ही बाजूने आरोप करीत असभ्य भाषेचा वापरही सभेत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अधिकारी उपस्थित असल्याने सभा कायदेशीर असावी आणि सभेचे कामकाज सुरू करावे, अशी भूमिका सत्ताधाऱयांना साथ दिली.

महापौरांसमोरच शेखर माने, मैनुद्दीन बागवान, धनपाल खोत, सुरेश आवटी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आवटी यांनी तर लोकांतून निवडून या असे आव्हानच माने यांना दिले. तर माने यांनी यांचे नगरसेवकपद रद्द झाले, यांना बोलण्याचा अधिकार नाही असे आवटींना प्रत्युत्तर दिले. 

सभागृहात रिव्हॉल्वर  काढा, फायरिंग करा अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्यामुळे सभेतील वातावरण तणावपूर्ण बनले. सत्ताधारी गटाने उपमहापौर विजय घाडगे व शेखर माने यांना सभागृहबाहेर काढा, त्यांना निलंबित केले आहे, यासाठी आक्रमक पवित्र घेत महापौरांच्या आसमासमोरच ठिय्या मारला. माने व घाडगे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून नगरसेवक संतोष पाटील व काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृह सोडण्याची तयारी चालवली. या गोंधळात शेखर माने यांनी महापौरांच्या आसनासमोर राजदंड पळविला. माने यांच्या बरोबरच उपमहापौर घाडगेही सभागृहातून बाहेर पडले.त्यानंतर महापौराने ही सभा रद्द करत दोघांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. 

सभेनंतर महापौराने शेखर माने यांच्यावर गुंडगिरीचा आरोप करत त्यांच्या गुंडगिरीला भीक घालत नाही. माळबंगल्याचा अहवाल दडपण्यासाठीच सभेत धिंगाणा  घातला आहे अशी टीका केली. घनकचरा प्रकल्पाचा आराखडा कायदेशीर कचाट्यात अडकू नये यासाठी ही सभा रद्द केली असून पुढील आठवड्यात नव्याने सभा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी माळ बंगल्याच्या जागा कृतीचा अहवाल सभेत सादर होऊ नये यासाठी शेखर माने यांनी दंगा घातला. या त्यांचे हितसंबंध गुंतले आहेत की काय? अशी शंका येते. या जागेचा सोक्षमोक्ष लावला सोय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. तर शेखर माने यांनी बेचाळीस कोटी रुपयांच्या लुटीचा उद्योग महासभेत हाणून पडला आहे. महापौरांनी एकेरी भाषेचा वापर करून पदाची गरिमा घालवली आहे, असा आरोप केला.