शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आर. आर. आबांकडून आरोग्य विभाग धारेवर

By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST

कवठेमहांकाळला आढावा बैठक : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कानपिचक्या

कवठेमहांकाळला आढावा बैठक : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कानपिचक्या कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये आज (शुक्रवारी) पार पडलेल्या आढावा बैठकीत आ. आर. आर. पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर धारेवर धरले. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावत याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला. पंचायत समितीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते आ. आर. आर. पाटील यांनी मतदारसंघातील कामाचा आढावा घेण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांची आज बैठक घेतली. कवठेमहांकाळ तालुक्यातील शाळा मोठ्या प्रमाणात ‘क’ वर्गात असून त्या ‘अ’ वर्गात येण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. २५:१५ योजनेमधील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेली अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील राष्ट्रीय पेय योजनेची आठही कामे अपूर्ण असल्याबद्दल छोटे पाटबंधारे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मार्चमध्ये मुदत संपूनही ही कामे अद्याप का पूर्ण झाली नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना या आठही योजनेचे ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खुलासे मागवावेत व चौकशी करून काम पूर्ण न केल्याबद्दल दोषी अधिकारी व ठेकेदार यांचेवर कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यास सांगितले. तालुक्यातील जनतेला वेळेत पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने अशा दोषी अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करावी, असे आदेश दिले.सध्या संपूर्ण राज्यामध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर आर. आर. पाटील यांनी आरोग्य विभागाचाही आढावा घेतला. तालुका आरोग्यधिकारी संगीता देशमुख यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. तालुक्यामध्ये डेंग्यू रोगाबाबत आरोग्य विभाग व अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचे जनजागरण केले, असा प्रश्न त्यांनी देशमुख यांना विचारला. मात्र यावेळी देशमुख यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावर आबांनी आरोग्य विभागाने संपूर्ण तालुक्यात आरोग्य अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, समाजातील काही प्रमुख व्यक्तींची समिती गठित करून डेंग्यूबाबत जनजागरण करावे, त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी पूर्णपणे दक्षता घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा प्रकारच्या सूचना दिल्या. सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी शासन पातळीवर जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करू, अशी ग्वाहीही दिली. (वार्ताहर)कारवाईचे आदेशतालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेची आठ कामे मार्चमध्ये मुदत संपूनही अद्याप अपूर्ण असल्याने आर. आर. पाटील यांनी छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. गटविकास अधिकारी यांना चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.