शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘विसापूर’च्या त्या सोळा गावांत ‘खानापूर’चा पैरा?

By admin | Updated: October 7, 2015 00:01 IST

राजकीय हालचाली : आजी-माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष ग्रामपंचायतीचा रणसंग्राम

दत्ता पाटील -- तासगावतासगाव तालुक्यातील मांजर्डे आणि विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघात समावेश आहे. त्यापैकी १६ ग्रामपंचायतींत निवडणुकीचे धुमशान होत आहे. खानापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची स्वबळ अजमावण्यासाठी चाचपणी सुरू आहे. मात्र तालुक्यातील आबा-काका गटाच्या संघर्षामुळे या नेत्यांच्या स्वबळाची आशा धूसर आहे. त्यामुळे या सोळा गावांसाठी पैऱ्याचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे.खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी विसापूर सर्कलमधील २१ गावांची व्होट बँक निर्णायक ठरणारी आहे. ही व्होट बँक आकर्षित करण्यासाठी आतापर्यंत खानापूरमधून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे. असे असले तरी, या नेत्यांचा आतापर्यंत स्वत:चा गट या गावांत निर्माण झालेला नाही. १६ गावांत आबा आणि काका गटाचाच पगडा आहे. यावेळीही या दोन गटातच अटीतटीची निवडणूक होणार आहे. गेल्या सहा महिन्यात विसापूर जिल्हा परिषद गट राजकीय भूकंपाचा केंद्रबिंंदू राहिलेला आहे. खानापूरच्या नेत्यांनी स्वबळासाठी या गावांत चाचपणी सुरू केली आहे. आर. आर. पाटील यांची पोकळी भरून काढण्यासाठी काही नेत्यांकडून आश्वासन दिले जात आहे. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याहीवेळी आ. अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना तासगाव तालुक्यातील नेत्यांशी पैरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. आबा, काका गटात कांटे की टक्कर मांजर्डे-विसापूर सर्कलमधील निवडणूक होत असलेल्या १६ गावांपैकी ९ गावांवर आबा गटाचे प्राबल्य आहे, तर ७ गावांवर काका गटाचे प्राबल्य आहे. विसापूर सर्कलमधील आबा गटाच्या काही शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर काहींनी राष्ट्रवादीत राहूनच खासदारांशी समझोता केला आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळी विसापूर सर्कलमधील ग्रामपंचायतीत कांटे की टक्कर होणार, हे स्पष्ट आहे.विसापूर सर्कलमधील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवायच्या की पाठिंबा द्यायचा, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. अर्ज दाखल करण्यासाठी अजून अवधी आहे. काही दिवसांत आमची भूमिका स्पष्ट करणार आहे. आमदार अनिल बाबर, शिवसेना.तासगाव तालुक्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. त्याबाबत अद्याप काही सांगता येणार नाही.- सदाशिवराव पाटील, काँग्रेस.